Home जालना मैत्रेय प्रकरणातील मुख्य आरोपी वर्षा सत्पाळकरला अटक करण्याची मागणी

मैत्रेय प्रकरणातील मुख्य आरोपी वर्षा सत्पाळकरला अटक करण्याची मागणी

47

जालना/ लक्ष्मण बिलोरे

-बहुचर्चित मैत्रेय फसवणूक प्रकरणी धुळे येथे शेतकरी संघटना आणि मैत्रेय ठेवीदार संघटनेच्या वतीने जन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मैत्रेय प्रकरणातील पिडितांना परतावा मिळण्यासाठी शासकीय, प्रशासकीय स्तरावरील कामासाठी गती मिळावी. मैत्रेय प्रकरणातील मुख्य आरोपी सिएमडी वर्षा सत्पाळकर यांना अटक करण्यात यावी अशी प्रमुख मागणी गुंतवणुकदारांच्या बाजूने शेतकरी संघटना आणि मैत्रेय ठेवीदार संघटनेने उचलून धरली.२०१५ पासून मैत्रेय पिडित ठेवीदार मैत्रेय कंपनीत गुंतवणूक केलेले पैसे परत मिळविण्यासाठी झटत आहेत. यामध्यें ८० टक्के महिलांचा पैसा अडकलेला आहे. राज्यसरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार लाडक्या बहिणींसाठी जी योजना राबवत आहे,हे सरकारकडून अनुदान आहे,परंतु मैत्रेय पिडित गुंतवणुकदार महिलांचा हक्काचा, कष्टाचा पैसा परत मिळविण्यासाठी गेल्या ९ वर्षांपासून रडकुंडीला आल्या आहेत. मैत्रेय मधील गुंतवणुकदार पिडित महिलांचे अश्रु पुसण्यासाठी सरकारने या पिडित गुंतवणूकदार लाडक्या बहिणींना अग्रक्रम द्यावा. लवकरात लवकर हक्काचा कष्टाचा पैसा परत मिळवून द्यावा.अशी लाखों पिडित गुंतवणूकदार महिलांची आग्रही मागणी आहे. लोकांच्या जाचामुळे राज्यातील गोरगरीब महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पिपळकर यांना ठेवीदार संघटनेकडून निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी मैत्रेय प्रकरणाबाबत सखोल माहिती घेऊन ‘शासन स्तरावर मी प्रयत्न करेन ‘ असे ठेवीदार संघटनेला आश्वासन दिले. निवेदन देताना नानासाहेब पाटील, पिंटूदर्डा, राजेंद्र देवरे,ईश्वर पाटील, सदानंद कोठावदे,मनीष केले,बाळकृष्ण गिडगे,अमृत पाटील, सुभाष सिरसाठ,उल्हास जैन,मनिषा पाटील, मनिषा सोलंकी, विद्या ठाकूर,सिरपूर,सोनगीर,पारोळा,अंमळनेर, साक्री येथून असंख्य मैत्रेय ठेवीदार पोटतिडकीने हजर होते.