यवतमाळ : स्वातंत्र्यदिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त स्थानिक अंजुमन उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात दि इस्लामिया अँग्लो एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जाफर सादिक गिलानी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रगीतानंतर मंचा वर उपअध्यक्ष अब्दुल खालिद, सचिव अन्वर सेठ लोढा, सदस्य मुहम्मद मक्की सेठ, आसिफ गिलानी, शोएब शिवानी, अब्दुल जावेद, हायस्कूलचे मुख्याध्यापक अब्दुल रफिक, प्राथमिक मुख्याध्यापिका शगुफ्ता नसरीन, इंग्लिश स्कूल सोनिया मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुलांना मार्गदर्शन केले.
यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले त्यात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, नाटके सादर केली.सांस्कृतिक कार्यक्रमानंतर एक विशाल तिरंगा रॅली काढण्यात आली जी नवीन आरटीओ कार्यालय, अशोक नगर, अल कबीर नगर, शालीमार पार्क, रहीम नगर, अमन नगर इ. मार्गे शाळेचा परिसर मध्यें दाखल झाली.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजुमन उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक अब्दुल रफिक, शिक्षक नदीम नियाजी, सबा नसरीन, नजमुल आसरा, काझी इफ्तेखार अली, काझी अफसर अली, मुहम्मद वसीम कौसर, काझी जहीरुद्दीन, मुहम्मद मारूफ अली, सबीहा अंजुम, मारिया ऐमन, तूबा नियाज़ी,सैय्यद मिन्हाज, मनसब बी आदिने परिश्रम घेतले.