अमीन शाह
सिंदखेडराजा ,
साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड हे कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गस्त घालीत असतांना साखरखेर्डा येथे विनानंबर वाहन वाळू वाहतूक करताना आढळून आले. त्यावर कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन राजे जाधव, पो कॉ. इनामे, वाघ, गिते हे शासकीय वाहन क्रमांक एम एच २८ के ४१८९ ने साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालीत असतांना एक पिवळे रंगाचे विना नंबर अशोक लेलॅन्ड कंपनीचे रेती भरलेले वाहन (टिप्पर) वाहतूक करताना मिळून आले. वाहन चालक याला नाव विचारले असता अक्षय अनिल देशमुख रा. साखरखेर्डा असे सांगितले रेतीच्या रॉयल्टी बाबत पोलीसांनी माहिती विचारली असता त्याच्या जवळ रॉयल्टी नसल्याचे आढळून आले. सदर वाहनांचे कागदपत्रे तपासली असता एम एच ३० ए व्ही ०२९८ असल्याचे दिसून आले तरी सदर वाहन चालक विना परवाना बेकायदेशीर रित्या असल्याने विना नंबर गाडी किंमत १२ लाख, गाडीच्या डाल्यामधील रेती ४ ब्रास १६ हजार रुपये असा एकूण १२ लाख १६ हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई ही १६ ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन राजे जाधव यांच्या फिर्यादीवरून पो हेड कॉन्स्टेबल कडुबा गिते यांनी कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहीता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन इंगळे करीत आहेत.