Home यवतमाळ कार्यालयात राष्ट्रध्वजारोहण न करनाऱ्या बँक अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित कारा

कार्यालयात राष्ट्रध्वजारोहण न करनाऱ्या बँक अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित कारा

38

काय होते झेंडावंदन नाही केले तर ?

कळंबच्या बडोदा बँक व्यवस्थापकाचे मत

कळंब, 20 ऑगस्ट शहरातील बडोदा बँकेमध्ये १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाखा व्यवस्थापकामुळे होऊ शकला व्यवस्थापकामुळ नाही. ‘काय होते झेंडावंदन नाही केले तर असे त्यांचे म्हणणे होते. कळंबच्या मध्यवस्तीतील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत दरवर्षी ध्वजारोहण कार्यक्रम होतो. परंतु, यावर्षी नव्याने रुजू झालेले शाखा व्यवस्थापक अनुराग दुपारे यांनी ‘१५ ऑगस्टला झेंडावंदन करणे आवश्यक नाही. त्यामुळे मी टेन्शन घेत नाही. आपणही टेन्शन घेऊ नका’, असे कर्मचाऱ्यांना सांगून बँकेत झेंडावंदन केलेच नाही

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन न करणे ही माझ्याकडून चूक झाली. २६ जानेवारीला बँकेत धूमधडाक्यात गणराज्य दिनाचा उत्सव साजरा करू.

अनुराग दुपारे, शाखा व्यवस्थापक, बडोदा बँक

ही बातमी शहरात वान्यासारखी पसरताच काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची चांगलीच कानउघाडणी केली. सध्या हे प्रकरण कळंबमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. हा विषय बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळवला आहे