Ø आढावा बैठकीला आमदारांची उपस्थिती
Ø स्टेड, मंडप उभारणीच्या कामाला गती
Ø व्यवस्थेसाठी मंडपाचे 25 सेक्टरमध्ये विभाजन
यवतमाळ – यवतमाळ शहरानजीक किन्ही येथे मोकळ्या मैदानात दि.24 ऑगस्ट रोजी आयोजित महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे. महसूल भवन येथे आज आ.मदन येरावार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी तयारीचा आढावा घेतला.
बैठकीला आमदार व जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम उत्तमपणे पार पाडण्यासाठी तब्बल 26 समित्या नेमण्यात आल्या आहे. त्यात कार्यक्रम स्थळ, समन्वय, स्वागत व्यवस्था, मान्यवर व महिलांची वाहतूक व्यवस्था, भोजन व्यवस्था, अधिकारी समन्वय समिती, लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, स्टॅाल व्यवस्थापन, रांगोळी व सजावट, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता व पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था, तांत्रिक व्यवस्थापन, ओळखपत्र व पासेस, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण समिती आदी समित्यांचा समावेश आहे.