Ø स्टेज, मंडप उभारणी अंतीम टप्प्यात
Ø कार्यक्रमाची तयारी पुर्णत्वाकडे
Ø लाडक्या बहिणीस मुख्यमंत्री देणार धनादेश
यवतमाळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दि.24 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता किन्ही येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या तयारीचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला. कार्यक्रमाची तयारी अंतीम टप्प्यात असून वेळेत सर्व कामे पुर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.
बैठकीला पालकमंत्र्यांसह आ.मदन येरावार, आ.नामदेव ससाणे, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.