Home बुलडाणा जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत शिक्षकाने केला मुलींचा लैंगिक छळ ,

जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत शिक्षकाने केला मुलींचा लैंगिक छळ ,

60

आहो गुरुजी हे बरं नव्हं ???

अमीन शाह

सिंदखेडराजा , (जी ,बुलडाणा ) विद्यामंदिरात विद्या दानाचे कार्य सोडून चिमुकल्या विद्यार्थिनी सोबत असभ्य वर्तन करणाऱ्या एका गुरुजीने संताप जनक कृत्य केले. आधीच राज्यात महिला सुरक्षा वरून संताप उसळलेला असतांना बदलापूर , अकोला आता सिंदखेडराजात लहान चिमुकल्या मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे ,
सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बु येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवरील शिक्षक खुशाल उगले यांनी इयत्ता चौथीच्या वर्गातील चिमुरड या मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना आज २३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली. आहे आरोपी शिक्षक खुशालराव उगले हे इयत्ता चौथीच्या वर्गाला वर्गशिक्षक म्हणून कार्यरत आहे वर्दडी बु येथील पालक व 3 मुलींनी थेट पोलीस स्टेशन गाठून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली.
सिंदखेडराजा तालुक्यात वर्दडी बु येथे जिल्हा परिषद शाळा असून या शाळेवर इयत्ता १ ते ८ वर्ग आहेत. मागील एक ते दीड वर्षापासून येथे आरोपी शिक्षकां कार्यरत आहे , मागील वर्षी त्यांच्याकडे इयत्ता ३ चा वर्ग होता. यावर्षी वर्ग ४ था होता. इयत्ता ४ थीला खुशाल उगले नावाचे शिक्षक आहेत, सदर शिक्षक हे स्वतः वर्ग शिक्षक असलेल्या विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन करत असल्याचे पालकांनी सांगितले या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा अँड , प्रदिप सोनकांबळे, विठ्ठल सोनकांबळे यांच्या पर्यंत गेल्याने या घटनेला वाचा फोडण्यासाठी त्यांनी पालकांना सोबत घेऊन किनागव राजा पोलीस स्टेशन गाठले आणि किनगाव राजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद नरवडे यांना माहिती दिली माहिती मिळताच ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली, दोन्ही पोलीस अधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या शिक्षकां विरोधात विविध कलमांव्ये गुन्हा दाखल केला असून या शिक्षकां विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.या नराधम शिक्षकां विरुद्ध अप क 183/2024 कलम 64(2) (f) (1) (m),65(2), 76(1) (1)B.N. 5. सह कलम 4, 6,8,10,12 का.से.अ.प्र.अधि. 2012, सहजम 3(1) (w) (1) (1) (2) (v).3 (1) (R) (s) (w), गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम ठाणेदार विनोद नरवाडे करत आहे.