Home औरंगाबाद औरंगाबाद धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलीवर दादा महाराजांने केला अत्याचार ,

धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलीवर दादा महाराजांने केला अत्याचार ,

60

 

 

गुन्हा दाखल तपास सुरू पीडित मुलींचा आकडा वाढण्याची शक्यता ,

अमीन शाह

औरंगाबाद / कन्नड ,

धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर संस्थाचालकाने बलात्कार केला, तर दुसऱ्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना कन्नड तालुक्यातील हतनूर येथील एका निवासी शिक्षण संस्थेत समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या आईने या प्रकरणात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत संस्थाचालक व्यक्तीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दादा महाराज अकोलकर ऊर्फ बाबा (वय ६७) असे या नराधमाचे नाव आहे.

अकोलकरची माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्था आहे. त्याच्या संस्थेत धार्मिक व शालेय शिक्षण घेण्यासाठी १५ मुली राहतात. १३ ते १८ वयोगटातील या मुली आहेत. यातीलच एका १३ वर्षीय मुलीला धमकी देत त्याने बलात्कार केला. तिच्यासोबतच्या १४ वर्षीय मुलीवरही बलात्काराचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तो विद्यार्थिनीकडून सुरुवातीला पाय दाबून घ्यायचा. सर्व मुली झोपेत असताना २० ऑगस्टला रात्री १२ ते १२.३० च्या सुमारास त्याने मुलीला झोपेतून उठवून बोलावले. तिला पाय दाबण्यास सांगितले. ती पाय दाबत असताना महाराज ची वासना जागृत झाली व महाराजने त्या मुलीवर बलात्कार केला ,

याबाबत कुणाला काही सांगितले तर शिक्षण देणार नाही, अशी धमकी त्याने दिली. धमकीला घाबरून तिने अत्याचार सहन केला. त्यानंतर त्याने तिच्या बाजूला झोपलेल्या १४ वर्षीय मुलीलाही पाय दाबण्यासाठी बोलावून घेत बलात्काराचा प्रयत्न केला. बाहेर आवाज आल्याचा भास झाल्याने तो उठला. ही संधी साधून मुलगी तिथून पळाली. दोन्ही मुलींनी भयग्रस्त अवस्थेत कशीबशी रात्र जागून काढली. त्यानंतर कुटुंबीयांना कळवले. कुटुंबीयांनी येऊन अकोलकरला जाब विचारला असता तो बलात्कार केल्याचे नाहीच म्हणत होता. त्यानंतर पीडितेच्या आईने कन्नड ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार करत आहेत. घटनेची माहिती मिळताच या शिक्षण संस्थेत उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी भेट दिली. अकोलकरला अटक केली आहे. त्याने यापूर्वीही अनेक मुलींचे शोषण केल्याची शक्यता नाकारता येत नाही.