Home नांदेड पत्रकार संरक्षण समितीच्या सोशल मीडिया जिल्हाउपाध्यक्षपदी आशिष देशपांडे तर शहर सहसचिवपदी दीपक...

पत्रकार संरक्षण समितीच्या सोशल मीडिया जिल्हाउपाध्यक्षपदी आशिष देशपांडे तर शहर सहसचिवपदी दीपक जोंधळे यांची निवड…!

33

नांदेड: पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी मागील अनेक वर्षांपासून लढा लढणारी संघटना पत्रकार संरक्षण समिती या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात पत्रकारांच्या हितासाठी संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जातात त्याचबरोबर पत्रकारांसाठी अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा या संघटनेच्या माध्यमातून राबवले जातात या पत्रकार संघटनेच्या सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्षपदी आशिष देशपांडे कृष्णूरकर

तर शहर सचिव पत्रकार दीपक जोंधळे यांची निवड संस्थापक अद्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड व जिल्हासचिव शशिकांत पाटील गाडे यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे.

सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी अर्थात युट्युब, पोर्टल हे सोशल मीडियाचाचे जग आहे. या काळात पत्रकारांवर अनेक अडचणी येत आहेत तर या पत्रकारांना कुठलीही मदत कोणीही करत नाही तर या पत्रकारांच संघटन व्हावं आणि संघटनेच्या माध्यमातून त्यांचे संरक्षण व्हावं या भावनेतून पत्रकारांच्या संघटनेसाठी मागील अनेक वर्षांपासून काम करणारे ज्येष्ठ पत्रकार महेंद्र गायकवाड आणि पत्रकार शशिकांत गाडे पाटील यांनी पुढाकार घेऊन सोशल मीडिया युट्युब, पोर्टल या माध्यमांवर काम करणाऱ्या पत्रकारांसाठी एक वेगळी विभाग सुरू केला आहे पत्रकार संरक्षण समितीचे सोशल मीडिया हे विभाग युट्युब, पोर्टल च्या पत्रकारांसाठी एक विभाग असेल अशी माहिती यावेळी बोलताना पत्रकार संरक्षण समितीचे महेंद्र गायकवाड आणि शशिकांत गाडे पाटील,जिल्हा संघटक गंगाधर गच्चे यांनी दिली. या प्रसंगी दिव्यांग समितीचे राहुल साळवे व इलेक्ट्रानिक मीडियाचे अमोल शेळके उपस्थित होते.