जालना /लक्ष्मण बिलोरे
– बहुचर्चित मैत्रेय ग्रुप कंपनीने गुंतवणुकदारांच्या पैशातूनच मालमत्ता जमवली, असे स्पष्टीकरण मुंबई सेशन कोर्टाने सुनावणी दरम्यान केले आज ,२९ ऑगष्ट रोजी मैत्रेय प्रकरणाची सुनावणी झाली. मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणुकदार संघटनेने या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागितली होती,मैत्रेय प्रकरणी आव्हान दिले होते,टाईमबाऊंड अर्ज दाखल केल्याने त्यानूसार सेशनमध्ये मैत्रेय प्रकरणाला गती मिळाली. मैत्रेय कंपनीने २५०० कोटी रूपयांची २८ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली आहे.१९९८ साली सुरू आलेल्या मैत्रेय कंपनीने २०१६ मध्ये अचानक कंपनी बंद केली.१८ वर्षांत गुंतवणुकदारांच्या पैशातून कोट्यावधीची मालमत्ता जमवली. मागील ८ वर्षांपासून पिडित गुंतवणूकदार परतावा मिळण्यासाठी शासकीय, प्रशासकिय विभागाकडे पाठपुरावा करत होते .मैत्रेय संचालकांवर गुन्हे दाखल झाले,अटक झाली.प्रकरण कोर्टात गेले.परंतु गुंतवणूक केलेला पैसा परत मिळत नव्हता.ज्यांनी रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली बेरोजगार महिला,तरुणांना खोटी अमिषे दाखवून गुंतविले त्यांनीही हात वर केले.त्यामुळे गुंतवणुकदार सैरभैर झाले होते. फसवणूक झालेले गुंतवणूकदार एकत्रित येऊन नाशिक येथील संगिता कदम यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर २०२२ मध्ये संघटना स्थापन झाली.ॲडव्होकेट संतोष भटगुणाकी यांच्या हाती प्रकरण सोपवले. ॲडव्होकेट प्रदीप घरत यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने कामकाज चालले…आज मैत्रेय मुंबई सेशन कोर्टात सुनावणी झाली. संघटना अध्यक्ष संगीता कदम, हेमलता पाटील, रजनी माळकर,कल्पना महाजन, सुमित्रा कुचनकर, मंदाकिनी अत्राम,मीना डांगे,सुनीता मॅडम, विपिना पाटील,सुधिर माळकर, लक्ष्मण कोर,प्रधान आदी संघटना सदस्य उपस्थित होते. सुनावणी दरम्यान, कोर्टाने स्पष्टीकरण दिले कि ‘ मैत्रेय कंपनी संचालकांनी घेतलेल्या मालमत्ता ह्या गुंतवणूकदारांच्या पैशातूनच घेतलेल्या आहेत,५ ऑगष्ट रोजी जी आर्डर झाली,त्यानूसार इओडब्ल्यू आणि सिए यांनी कामकाजाची आवश्यक ती कागदपत्रांची पुर्तता करावी’ अशा सूचना दिल्या आहेत.मैत्रेय प्रकरण एका निर्णायक स्थितीत कोर्टात आहे. मागील दहा वर्षापासून दुर्लक्षित प्रकरणात संघटनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे .संघटना सतत कोर्टात प्रत्येक बाजूने प्रयत्नशील आहे. आज कोर्टात मैत्रेय असोसिएशनने अडव्होकेट जामखंडी यांची मैत्रेय प्रकरणात नियुक्ती केली आहे. व ते मैत्रेय प्रकरणात सहभागी झाले आहेत.