Home भंडारा खेळाडूंनी देशात जिल्ह्याचे नाव लौकीक करावे – खासदार डॉ. प्रशांत पडोळे

खेळाडूंनी देशात जिल्ह्याचे नाव लौकीक करावे – खासदार डॉ. प्रशांत पडोळे

11

भंडारा येथे राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त प्राविण्य प्राप्त करणाऱ्या ९५ खेळाडूंचा जाहिर सत्कार

भंडारा: – ऑलम्पिक सुवर्ण कालखंडाचे शिल्पकार स्व. मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव व्हावा व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने त्यांचा जन्म दिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन होत असते. आणि याच अनुषंगाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गुणगौरव होत असते. यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असते. खेळाडूंनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास बाळगून आई-वडिल, गुरुजन तसेच जिल्ह्याचे नाव लौकीक करावे असे प्रतिपादन खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केले.
ते क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा, जिल्हा क्रिडा परिषद, एकविध क्रीडा संघटना, खेलो इंडिया व जिल्ह्यातील विविध संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय हाकी खेळाडू स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. प्रशांत पडोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र भांडारकर, स्वाती नंदागवळी, दिपाली शहारे, योगेश घाटबांधे, वैष्णवी तुमसरे, प्रिया गोमासे, प्रतिष्ठीत नागरिक धनंजय तिरपुडे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पहाडे, आशु गोंडाणे, विकल सार्वे, मनोज साकुरे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, शैलेंद्र श्रीवास्तव, अरूण बांडेबुचे, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत ईलमे, तलवारबाजी असोशिएशनचे सुनिल कुरंजेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मार्गदर्शक मंगेश गुडघे, योगेश खोब्रागडे, आर्चरी संघटनेचे आशिक चुटे, हेमंत धुमनखेडे, श्याम देशमुख, सुनिल खिलोटे, गणेश साकुरे, योगेश कुंभारे, नाना भिवगडे, शोएब अंसारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या स्मारकाला मार्ल्यापण करण्यात आले. व रॅलीला पोलीस उपनिरीक्षक (गृह विभाग) यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात करण्यात आले. त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मेजर ध्यानचंद अमर रहे, भारत माता की जय, आदीच्या घोषणांनी भंडारा शहर दुमदुमले होते. ही रॅली गांधी चौक- पोष्ट आफिस चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलनात समारोप करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्व. मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पुजन व मार्ल्यापण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
त्यावेळी धनंजय तिरपुडे यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीचे जादुगर स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जिवन चरित्र्यावर विशेष प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये भाग घेवून जिल्ह्याचे नाव लौकीक करावे असे प्रतिपादन आशु गोंडाणे यांनी केले. व नरेंद्र पहाडे यांनी सुध्दा प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळामध्ये हिरहिरीने भाग घेवून महाविद्यालयासह आपले नाव उज्वल करावे असा सदेश दिला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील विजयी, प्राविण्य प्राप्त करणाऱ्या ९५ खेळाडू व संघाचे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमा दरम्यान जिल्ह्यातील विविध शाळा, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा शिक्षक, क्रीडा कार्यकर्ता, नागरिक, क्रीडा प्रेमी तसेच क्रीडा विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल कुरंजेकर व सुर्यकांत ईलमे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा मार्गदर्शक अविनाश निंबार्ते यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मार्गदर्शक मंगेश गुडघे, आकाश गायकवाड, निखिलेश तभाणे, प्रविण देसाई, राजेंद्र सावरबांधे, सौरभ तोमर, सागर साखरे, सुरज लेंडे, अतुल गजभिये, सुधीर गळमळे, रामभाऊ धुळसे, अंकित भगत, संध्या भोवते, विवेक उजवणे, गोल्डी राठोड, हेडाऊ, घाटबांडे, हेडाऊ, पडोळे, सागर साखरे, विलास पराते, गौरव भुरे, विवेक चटप, विशाल टेंभुरकर, अनुष्का पडोळे, अश्विन सेलोकर, प्राची चटप, रूपाली कनोजे, संध्या भोंदे, निखिता मेश्राम इत्यादी विद्यार्थीनी विद्यार्थ्यांनी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा, जिल्हा क्रिडा परिषद, एकविध क्रीडा संघटना, खेलो इंडिया व जिल्ह्यातील विविध संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.