Home यवतमाळ गरीब रुग्णांच्या तोंडी निकृष्ट आहार “मनोज गेडाम” यांच्याकडून पाहणी जीएमसीत भोजन भ्रष्टाचार

गरीब रुग्णांच्या तोंडी निकृष्ट आहार “मनोज गेडाम” यांच्याकडून पाहणी जीएमसीत भोजन भ्रष्टाचार

50

यवतमाळ : जिल्हा शासकीय रुग्णालयातील निकृष्ट भोजन आणि त्यात फोफावत चाललेल्या भ्रष्टाचारावर वरिष्ठांकडून मौन साधले जात असल्याने याचा तीव्र शब्दात गुरुदेव युवा संघाने टीका केली आहे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी आज दुपारच्या भोजनाच्या वेळी शासकीय रुग्णालयात भेट देऊन भोजनाचा दर्जा तपासला याशिवाय इथले अन्न ज्यांच्याकडून पळवून नेले जात आहे त्यांचा शोध घेण्याची तयारी गेडाम यांनी बोलून दाखवली

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयात दर दिवशी हजारोच्या संख्येने रुग्ण आपल्या उपचारासाठी दाखल होतात या ठिकाणी त्यांना नियमानुसार दोन वेळचे जेवण दिले.जाते परंतु या भोजनात मागील बऱ्याच दिवसांपासून भ्रष्टाचार बोकाळला आहे. गरीब गुणांच्या तोंडचा घास पळून नेत असल्याचा संतापजनक प्रकार येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. या गैरप्रकारावर आजपर्यंत अधिष्ठा त्यांनी लक्ष दिले नाही यावर कोणीही आवाज काढायला तयार नाही. त्यामुळे नेमक्या या भ्रष्टाचाराला कुणाचे पाठबळ आहे असा प्रश्न गेडाम यांनी उपस्थित करून आज वॉर्ड क्रमांक १३ मध्ये येणाऱ्या मेडिसिन कक्षात दिल्या जाणाऱ्या भोजन वाटपाची पाहणी केली पाण्याने व्यापलेले दूध तसेच पातळ डाळ पाहून त्यांनी खंत व्यक्त केली इथल्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.गरीब रुग्णांच्या वाटेला येणारे भोजन निकृष्ट दर्जाचे देऊन त्यांचेच अन्न पळवून नेत असल्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. या भ्रष्टाचाराला आजपर्यंत जागर करण्यात आले नसल्याने नेमके या भ्रष्टाचाराला पाठबळ कुणाचे असा प्रश्न गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून विचारला आहे इथल्या भ्रष्टाचाराचा मुद्द्दा मंत्रालयापर्यंत दाखल करण्यात आला आहे त्यामुळे वैद्यकीय मंत्र्यांकडून लवकरच या गैरप्रकारावर लक्ष घातले जाण्याची शक्यता आहे गरिबांच्या हक्काचे अन्न दुसरीकडे नेत असल्याचा प्रकार गुप्तपणे सुरू असून याला वरिष्ठांचीही मुक समंती असल्याने अधिष्ठातादेखील या प्रकारावर चुप्पी साधून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे इथल्या गैरप्रकारावर गुरुदेव यांच्याकडून लवकरच मोठे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.

रोगनिदानाचे नव्हे तर समस्यांचे रुग्णालय

एक्स-रे असो किंवा सोनोग्राफी केंद्र अशा बऱ्याच ठिकाणी अपुरे मनुष्यबळ तसेच तांत्रिक अडचणींचा सामना रुग्णांना करावा लागतो डॉक्टरांची तोकडी संख्यादेखील अनेकदा रुग्णसेवा प्रभावित करते. या सर्व गैरसोळीचा फटका सहन करत असताना मागील बऱ्याच दिवसांपासून गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील असुविधांकडे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष गेडाम हे लक्ष वेधत आहे परंतु त्याची पूर्तता करण्याकडे रुग्णालय प्रशासन लक्ष देत नसल्याचे वास्तव आहे त्यामुळे रुग्णांची मोठी परवड होत आहे.