Home यवतमाळ संकट मोचन परिसरातील नागरिकांनी केला संध्याताई सव्वालाखे यांचा भव्य दिव्य सत्कार ताईंना...

संकट मोचन परिसरातील नागरिकांनी केला संध्याताई सव्वालाखे यांचा भव्य दिव्य सत्कार ताईंना पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी

12

यवतमाळ – संकट मोचन विभागात पुरातन तान्हा पोळ्याची बंद पडलेली परंपरा संध्या ताई सव्वालाखे यांच्या शुभहस्ते परत सुरु झाली, व ही परंपरा बंद पडू देणार नाही याचे वचन ताईंनी दिले.

संकट मोचन परिसरात 1989 पासून जपलेली ताना पोळ्याची परंपरा मागील कोविड काळापासून तर आज पर्यंत काही कारणास्तव बंद पडली होती .परंतु दारूबंदी प्रणेता संगीता ताई पवार यांच्या प्रयत्नाने ही परंपरा परत पुनर्जीवित होण्यास शक्य झाले. या तान्ह्या पोळ्याच्या वेळी संध्याताई सव्वालाखे यांच्या शुभहस्ते पारंपारिक पद्धतीने हळदीचा गोळा तोरणावरून फेकून तान्हा पोळ्याची सुरुवात झाली .एकूण 147 बालकांनी यावेळी आपल्या छोट्याशा मातीच्या बैलांना सुंदर हार फुल तुरे यांनी सजवून तसेच सामाजिक संदेश देत छोट्या बालकांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली होती .उदघाटनाला आलेल्या महाराष्ट्र महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांना पाहण्यासाठी नागरिकांनी चिक्कार गर्दी केली होती .असा तान्हा पोळा 1989 पासून आजपर्यंत पहिल्यांदाच झाला असे समस्त संकट मोचन परिसरातील लोकांनी आपली भावना व्यक्त केली .परत ह्या परंपरेत कुठे खंड पडू नये अशी विनंती सर्वांनी संध्याताईंकडे केली .सोहळ्यात सर्वच पक्षाच्या लोकांनी आपापले पक्ष बाजूला सारत नागरिकांच्या आनंदात मिसळून उत्स्फूर्त सहभाग घेतला
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नेते रमेश अग्रवाल अभय भाऊ व्यास ,चेतन शिरसाट, संतोषी माता देवस्थानचे संचालक शाम वारजूरकर ,यवतमाळ महिला काँग्रेस अध्यक्षा उषाताई दिवटे , तेजस्विनी अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, संगीत विशारद राजू गिरी ,गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी आरेकर काका , हेमंतदादा गुल्हाने ,रंजीता ताई व इतर मान्यवर उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमासाठी संकट मोचन परिसरातील आनंद भाऊ जाधव रोशन भाऊ उदापुरे यश बोरेकर युवाशक्तीचे अध्यक्ष सम्राट उदापुरे भूषण भाऊ गिरी करण उईके गौरव बोरेकर निखिल राऊत अतुल लेंडे अरविंद मराठे सारंगधर गुरनुले सरोज ताई गजापुरे मंगलाताई पोयाम अतुल गजलवार विशाल मरगडे राजूभाऊ ठवकर यांनी अथक परिश्रम घेतले.