Home यवतमाळ मुख्यमंत्री वयोश्री योजनेवर राहणार गुरुदेवची नजर “प्रत्येक ज्येष्ठांना मिळवून देणार लाभ”

मुख्यमंत्री वयोश्री योजनेवर राहणार गुरुदेवची नजर “प्रत्येक ज्येष्ठांना मिळवून देणार लाभ”

17

गतिशीलतेसाठी ‘समाज कल्याण’ला निवेदन

यवतमाळ : शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेत कुठलाही गैरप्रकार होऊ देणार नाही.ज्या ज्येष्ठांसाठी ही योजना आहे अशा सर्वांना या योजनेचा लाभ मिळवून देईल तसेच यातील गैरप्रकारावर गुरुदेवची वक्रदृष्टी राहील,असे प्रतिपादन गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केले.विश्रामगृहात पार पडलेल्या ज्येष्ठ तसेच दिव्यांग बांधवांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीनंतर समाज कल्याण सह आयुक्तांना या योजनेला प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
१६ ऑगस्ट पासून ६५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून राज्यातील ज्येष्ठांना दरमहा ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.आजघडीला तब्बल ४ हजार पाचशेच्या वर अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती गेडाम यांनी यावेळी दिली.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरु करण्यात आलेल्या या योजनेबद्दल साशंकता व्यक्त होत असली तरी यातून ज्येष्ठांचे जीवनमान सुधारत असेल तर गुरुदेव युवा संघाकडून या योजनेचा नियमित पाठपुरावा घेतल्या जाईल,असे आश्वासन संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी दिले.या योजनेला केवळ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाकडून नव्हे तर नगर परिषदेकडूनदेखील राबविले जावे, यासाठी गेडाम हे पाठपुरावा करणार आहे.आयोजित दिव्यांग तसेच ज्येष्ठांच्या बैठकीत गेडाम यांनी गुरुदेव युवा संघाची आगामी रणनीती ठरविली.या योजनेचा लाभ बहुसंख्येने गोरगरीब ज्येष्ठाना दिला जावा यासाठी गुरुदेव युवा संघ हे आग्रही असणार आहे.योजनेला अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी गुरुदेव युवा संघाकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.यामध्ये जर का गैरप्रकार झाला तर संबंधिताला गुरुदेव युवा संघ सोडणार नाही,अशी तंबी त्यांनी यावेळी दिली.समाज कल्याणच्या सह आयुक्तांना निवेदन सादर करतेवेळी गुरुदेव युवा संघाचे शाखा उपाध्यक्ष भाऊराव वासनिक,लक्ष्मण माघाडे, नंदू रणगिरे, लक्ष्मण दाभेकर,स्वप्नील कोकांडे, मंदा मानकर, सुनील बिजवे,जोरावर सिंग,जगन, नेवला,नकेता,श्याम उर्फ जादूगार राठोड,,तुफान सिंग तसेच सामरी उपस्थित होते.

गरजूंचे फॉर्म गुरुदेव भरणार मोफत

योजनेसाठी लागणारे अत्यावश्यक असे प्रमाण म्हणजे आधार,मतदान,राष्ट्रीयकृत बँकेचे खाते, अर्जदारांचे दोन फोटो, स्वयं:घोषणापत्र, आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला या संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे त्यानंतर या योजनेचा लाभ थेट वृद्ध लोकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.गरजू ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज गुरुदेव युवा संघाकडून मोफत भरून दिले जाणार आहे.संपूर्ण जिल्ह्यातील ज्येष्ठांना लाभ मिळवून देण्यासाठी गुरुदेव युवा संघ विशेष दक्ष राहणार आहे.