Home जळगाव गुन्हेगार कोण?रस्ता बनवणारा कि रस्ता वापरणारा?

गुन्हेगार कोण?रस्ता बनवणारा कि रस्ता वापरणारा?

43

जळगाव शहरातील हायवे आता डांबरी बनवला.तीन वर्षांपूर्वी.जेंव्हा महाराष्ट्रात महाआघाडी सरकार होते.मुख्यमंत्री ठाकरे, नगरविकास मंत्री शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील आणि सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी होते.या लोकांना आपण जळगाव चे मतदारांनी,ज्यांचेसाठी रस्ता बनवला ते, यांना निवडून दिले आहे.हे लोकप्रतिनिधी म्हणजे सरकारी यंत्रणा आणि जनता या मधील माध्यम असतो‌.दुवा असतो.लोकप्रतिनिधी हे त्या त्या सभागृहात मतदारांचे आणि सर्वच नागरिकांचे वकील असतात, हितचिंतक असतात.या कामाबद्दल त्यांना मानधन म्हणून दीड दोन तीन लाख दरमहा दिले जाते.ओसएसडी,पीए, पोलिस, ड्राईव्हर असा नोकरांचा फौजफाटा पुरवला जातो.का?त्यांची गाडी पुसण्यासाठी नाही.त्यांची दारू मटण आणण्यासाठी नाही.त्यांचे कमीशन जमा करण्यासाठी नाही.हे तर जळगाव चे लोकांना माहिती पाहिजे.कारण शहरात सुशिक्षित उच्चशिक्षित लोकांचे प्रमाण जास्त आहे.मला तर माहिती आहे.मी गावठी,अडाणी,रांगडा असूनही.तर मग जळगाव मधील डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी उद्योजक नगरसेवक यांना तर माहिती असलीच पाहिजे.तरीही हे लोक रस्ता बाबत त्या पेड सर्व्हंट लोकप्रतिनिधीला जबाबदार न धरता रस्त्यावर येऊन कैमेराला बोलवून आंदोलन करतात.रस्ता अडवतात.कोणाचा?जो कोणी महत्वाचे कामानिमित्ताने घाईघाईने प्रवासाला निघतो.शाळेत जातो.कॉलेजला जातो.दवाखान्यात जातो.बाजारात जातो.नोकरीवर जातो.लग्नाला जातो.मौतवर जातो.अशा लोकांचा रस्ता का अडवला जातो? रस्ता तर लोकप्रतिनिधींचा अडवला पाहिजे.सांगितले पाहिजे,का रे! सोंगाड्या,बोंगाड्या,दारूड्या,शिंदाड्या,हा रस्ता खराब का बनवला?तुला आम्ही निवडून दिले आहे ना! मग या कामाची गुणवत्ता कोण पाहिल?तुझा बाप?

जळगाव शहरातील नागरिकांना रस्त्यावरील खड्डे पाहून राग येणे साहजिकच आहे.अपघात होऊन माणसे मेली तर संताप येणे स्वाभाविक आहे.पण हा राग, संताप कोणावर काढला पाहिजे?ज्याला निवडून देऊन, मानधन देऊन या कामावर ठेवले आहे.तर मग,त्यांचेवर राग का काढत नाहीत?रस्ता वापरणाऱ्या लोकांचा रस्ता का अडवतात?साफ चुकीचे आहे.उलटी दिशा आहे.वाईट दशा आहे.ही गुन्हेगारी मानसिकता आहे.ही लाचार आणि भयभीत मानसिकता आहे.
जे लोक रस्त्यावर आंदोलन करतात.मी पाहिले आहे.रस्ता कामातून कमीशन खाल्लेले आमदार खासदार मंत्री नगरसेवक महापौर उपमहापौर यांना स्टेजवर बसवून पुजा करतात.इतकी कि ,जसा हाच यांचा बाप आहे.जर आपण लोक चोरांची पुजा,मान सन्मान, सत्कार करीत असू तर तो चोर आणखी शिरजोर होणारच आहे.तो मातणारच आहे.तो कमीशन खाणारच आहे.यात शाळकरी आणि नोकरीवर जाणाऱ्यांचा काय दोष?
जळगाव शहरातील रस्ते ज्या कोणी ठेकेदाराने बनवले त्याला ठेका कोणी दिला? गुलाबराव, भोळे, पाटील महाजन, कुलभूषण यांनीच.कमीशन कोणी खाल्ले? यांनीच.दही मही दारू मटण कोणी चाखले?यांनीच .यांना ठेकेदाराने पैसे कोठून दिले? डांबर सिमेंट कमी वापरून.तर मग गुन्हेगार कोण? ठेकेदार कि तुमचा आमदार खासदार मंत्री नगरसेवक महापौर उपमहापौर?यांना निवडून कोणी दिले? तुम्हीच.मग यात अप्रत्यक्ष गुन्हेगार कोण? तुम्हीच.मी आंदोलन करणाऱ्यांचे चेहरे पाहिले.त्यांना विचारतो.तुम्ही आमदार, नगरसेवक निवडून देतांना मतांचे पैसे घेतले नाहीत का? मुलांच्या, मुलीच्या,आईच्या, बापाच्या, बायकोच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा,कि मी मताचे पैसे घेतले नाही.मी मत विकले नाही.जर हे खरे असेल तरच तुम्ही राग, संताप व्यक्त करू शकतात.तो सुद्धा आमदार खासदार मंत्री नगरसेवक महापौर उपमहापौर यांचेवरच!आहे का हिंमत?आहे का दानत?जर तुम्ही मत विकले नसेल तर या कमीशनखोरांना स्टेजवर बोलावून प्रश्न करू शकतात.सांग रे चोरा!हा रस्ता खराब का बनवला?अशी हिंमत असेल तर या माझ्या सोबत.आपण या कमीशनखोरांना, चोरांना आता निवडून द्यायचे नाही.त्यांनी मतांचे कितीही पैसे दिले तरीही! इतका स्वाभिमान, आत्मसन्मान,आत्मसंयमन असेल तर तुम्ही फुकट मत देऊन चांगला लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकतात.जर असे केले तरच तुम्ही आमदार खासदार मंत्री नगरसेवक महापौर उपमहापौर यांना धारेवर धरू शकतात.मी तर यांना धारेवर धरतो.
जळगाव मधील वेगळा अनुभव आमच्या गाठीशी आहे.आम्ही जळगाव शहरातील अनेक प्रभाग मधे जातो.वर्क ऑर्डर दिलेली अनेक कामे न करता पैसा लाटण्याचा प्रकार उघड केला.लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.ठेकेदार आणि आमदार घाबरले.त्यांनी वर्क ऑर्डर प्रमाणे काम केले.लोक खुष झाले.आमच्या सोबत जुडले.तर आमदारांना हे अडचणीचे वाटले.असे होत गेले तर आपले मतदार कमी होतील.आपण निवडून येणार नाहीत.म्हणून आमदारांनी अशा उस्फुर्त लोकांना मंदिर, गणपती,मारूती, शिवजयंती, नवरात्री अशा निमित्ताने सढळ हाताने देणगी दिली.ते पैसे पाहून उस्फुर्त लोक पुन्हा निस्तेज झाले.म्हणे शिवराम पाटील कडून कामही झाले शिवाय आमदार कडून पैसेही मिळाले‌.असा डबल फायदा होत असल्याने लोक आम्हाला बोलवतात.आम्ही जातो.बोंबा मारतो.काम ही होते आणि लोकांना देणगीही मिळते.जळगांव मधील लोकांची मज्जा होते.काम तर होतेच.शिवाय आमदारांच्या खिशातून मतदारांना पैसा ही वितरण होतो.तो आमच्याच वाट्याचा आहे.आमचेच रस्ता गटार सफाई आरोग्य मधून चोरलेला आहे.
पण अशी कमीशनखोरी,लांचखोरी बंद करणे आवश्यक झाले आहे.होईल .आमदार, नगरसेवक बदलले तर नक्कीच होईल.

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव