Home यवतमाळ निवासी उपजिल्हाधिकारी यांचेवर भ्रष्टाचारात सामील असल्याचा थेट आरोप करून “आमरण उपोषण “आंदोलन

निवासी उपजिल्हाधिकारी यांचेवर भ्रष्टाचारात सामील असल्याचा थेट आरोप करून “आमरण उपोषण “आंदोलन

28

यवतमाळ ( प्रतिनिधी) – मार्च २०२४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या अतिशय गंभीर एकूण नऊ मुद्द्यांवर कारवाई करण्याकरिता सतत दोन वर्षापासून पाठपुरावा करून साक्षी पुराव्यानिशी दोष निश्चित केले. परंतु जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई केल्या गेलेले नाही त्यामुळे तक्रारदार अमोल ओमप्रकाश कोमावार( व्हीसल ब्लोअर) यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तात्काळ कारवाई करावी अन्यथा “आमरण उपोषणाचा “इशारा दिलेला होता.

परंतु प्रकरण निवासी उपजिल्हाधिकारी श्री राऊत यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सोपवण्यात आल्यानंतर तक्रारदाराला रीतसर पत्र पाठवून आश्वासन देण्यात आले की, “आम्ही तात्काळ कारवाई करून आपल्याला कळवू ,कृपया आपण उपोषण करू नये”
परंतु तब्बल सहा महिने लोटून गेले तरीही खुलेआम भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची कुठलीही चौकशी किंवा त्यांच्यावर कारवाई केल्या गेलेले नाही याउलट त्यांना रीतसर भ्रष्टाचार करण्याची परवानगी मिळाल्यासारखे अजून जोमाने भ्रष्टाचार करू लागले व अतिशय गर्वाने ,”आमचं कोणीच वाकड करू शकत नाही. अशा तोऱ्यात तक्रारदारासमोर आव आणत आहेत . व विषय अतिशय वैयक्तिक घेऊन तक्रारदारावर भ्रष्ट अधिकाऱ्यां करवी दबाव तंत्राचा तसेच गुंड प्रवृत्तीचा वापर केल्या जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, घाटंजी तहसील कार्यालयातील अतिशय वादग्रस्त व अव्वल नंबरचा भ्रष्टाचारी अशी ओळख असलेल्या व “पालकमंत्री माझा भाऊ “अशी खुलेआम दहशत पसरवणारा निवडणूक नायब तहसीलदार दिलीप राठोड यांचे अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे सर्व साक्षी पुराव्यानेशी तसेच सुनवाई मध्ये दोष निश्चित झाल्यानंतर सुद्धा सध्या घाटंजी येथे कार्यरत निवडणूक नायब तहसीलदार दिलीप राठोड यांचे वर फक्त पालकमंत्र्याचा भाऊ असल्यामुळे कारवाई केल्या जात नाही असे प्रथम दर्शनी स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर तात्कालीन परिविक्षाधीन तहसीलदार मोहनीश शेलवटकर यांची अनेक प्रकरणात अनियमितता असल्याबाबतचे पुरावे दिल्यानंतर सुद्धा कुठलीच कारवाई नाही.
वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या उत्खननातील गौण खनिज खुलेआम खुल्या बाजारात विकून करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडविला व दर दिवशी यातील संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी करोडो रुपयाची कमाई केल्याबाबत साक्षीपुराव्यानिशी अधिकाऱ्यांचे दोष निश्चित होऊन सुद्धा कारवाई केल्या गेलेली नाही.
अशा अनेक प्रकरणात भ्रष्टाचारांचे पुरावे व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे दोष निश्चित व स्पष्ट झाल्यानंतर सुद्धा त्यांचे वर कुठलीच कारवाई केल्या जात नाही त्यामुळे यातील तक्रारदार अमोल कोमावार (व्हीसल ब्लोअर) तात्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी श्री राऊत यांचे वर भ्रष्टाचारात सक्रिय सहभागी असल्याचा थेट आरोप लावून दिनांक 19 सप्टेंबर 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या परिसरात “आमरण उपोषण “आंदोलनाचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.
या पत्रकामध्ये नमूद एकूण १ ते ९ मुद्द्यांवर कारवाई करण्यात यावी याकरिता “आमरण उपोषण “असल्यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमध्ये हाडकंप सुटलेला असून पालकमंत्र्यांनी सुद्धा याची दखल घेतली असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले अतिशय गंभीर मुद्द्यावरील “आमरण उपोषण” आंदोलन म्हणजे मंत्र्यांची व अधिकाऱ्यांची झोप उडवल्यासारखेच आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे विरोधकांचे सुद्धा चांगलेच लक्ष लागलेले आहे हे स्पष्ट दिसत आहे आणि तशी महसूल वर्तुळात सुद्धा गरमागरम चर्चा चालू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.