Home मराठवाडा मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेच्या प्रयत्नांमुळेच मैत्रेय फसवणूक प्रकरणाचा तिढा सुटला,पिडितांना परतावे मिळण्याचा मार्ग...

मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेच्या प्रयत्नांमुळेच मैत्रेय फसवणूक प्रकरणाचा तिढा सुटला,पिडितांना परतावे मिळण्याचा मार्ग मोकळा…!

58

जालना /लक्ष्मण बिलोरे

बहुचर्चित मैत्रेय फसवणूक प्रकरण हे 06/11/2018 पासून न्यायप्रविष्ट झालेले आहे.. असे तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई महाराष्ट्र, यांचे पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात जाहीर केलेले आहे..सदरील प्रसिद्धी पत्रकात स्पष्टपणे सांगितले आहे की, “न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सक्षम प्राधिकारी अधिकारी यांच्यामार्फत परत करण्यात येतील.त्यामुळे ठेवीदारांनी अन्य व्यक्ती/यंत्रणेकडे संपर्क साधू नये.”अशी माहिती मैत्रेय गुंतवणूकदार संघटनेच्या अध्यक्ष संगीता कदम यांनी दिली.या संदर्भात अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते, त्यात न्यायालयीन प्रक्रिया आणि सक्षम प्राधिकारी अधिकारी यांच्या संयुक्त कार्यवाहीनंतर गुंतवणुकदारांना शेवटी परतावा हा सक्षम प्राधिकारी अधिकारी यांच्यामार्फत परत दिला जाईल, हे दिसून येते. हे पत्रक जाहीर झाले तेव्हा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले गेलेले होते.व त्या जप्त मालमत्तेच्या विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया न्यायालयात सुरू होती.. तेव्हापासून तर ऑगस्ट 2024 पर्यंत म्हणजे गेली सहा वर्षे न्यायालयात हि प्रक्रिया सुरूच होती व प्रकरण हे एकाच मुद्यावर तेव्हापासून थांबलेले होते. परंतु मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणुकदार संघटना या संघटनेने ॲड. संतोष भटगुणाकी यांची नियुक्ती करून गुंतवणूकदारांच्या परताव्याच्या मागणीसाठी न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होऊन या अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या प्रकरणात गती प्राप्त करण्यासाठी मा.हायकोर्टात दाद मागितली.. हायकोर्टात संघटनेच्या बाजूने निकाल लागला.. व 4 आठवड्यात संबंधित जप्त मालमत्ता विक्री करण्याची परवानगी देवून पिडीतांचे परतावे लवकरात लवकर परत करा असा आदेश मुंबई हायकोर्टाने 26/07/2024 रोजी सेशन कोर्टास दिला.त्या आदेशाचे पालन करत संबंधित एम. पी. आय. डी. स्पेशल मुंबई सेशन कोर्टात मैत्रेय प्रकरणात न्यायाधीश माननीय नितीन शुक्ला यांनी 05/08/2024 रोजी निर्विवाद मालमत्ता विक्रीचा आदेश सक्षम प्राधिकारी अधिकारी यांना दिला आहे व त्यानुसार त्यांनी कार्यवाहीस सुरुवात केली आहे.. ही अतिशय महत्वाची बाब समजली जात आहे.संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती कदम यांनी आवाहन केले आहे कि,
मैत्रेय पिडित गुंतवणूकदारांनी त्यांच्या परताव्यासाठी फक्त न्यायालयीन प्रक्रिया आणि सक्षम प्राधिकारी अधिकारी यांच्या कार्यवाहीकडे लक्ष ठेवून पुढील आदेशाची वाट पहावी.. न्यायालयीन प्रक्रियेत संपूर्ण मैत्रेय पिडीतांच्या परताव्यासाठी आजच्या घडीला कोर्टात फक्त मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणुकदार संघटना ही एकमेव संघटना आहे.गुंतवणुकदार संघटनेकडून जी माहिती पिडीत गुंतवणुकदारांना दिली जाते ती सत्यता पडताळूनच दिली जाते. न्यायालयीन प्रक्रिया, शासन व प्रशासन यांच्या मार्फत परतावा मिळण्यासाठी संघटना तसेच संघटना अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणी व सभासद सतत प्रयत्नशिल आहेत.गुंतवणुकदार संघटनेच्या अध्यक्ष संगीता कदम, प्रभारी रविंद्र वाटेकर, उपाध्यक्ष रजनी माळकर, सचिव शारदा शिंदोडे, खजिनदार हेमलता पाटील यांच्यासह अनिल अहीरे, राजेश्वरी पाटील, सर्जेराव जाधव,कोमल शेरकर, कल्पना महाजन, अनिता पाटील, भरत सपकाळ, आदी सभासदांचा सक्रिय सहभाग हा परताव्याच्या कामी आहे.