Home महत्वाची बातमी बुलडाणा येथे अँड.सतीशचंद्र रोठें पाटील यांच्यासह 26 मोर्चेकरांवर गुन्हे दाखल.

बुलडाणा येथे अँड.सतीशचंद्र रोठें पाटील यांच्यासह 26 मोर्चेकरांवर गुन्हे दाखल.

19

धार्मिक तणाव निर्माण करून दंगल घडविणारे नितेश राणे मोकाट.

आरोपी राणें जेरबंद होण्याऐवजी मोर्चेकरीच जेरबंद.

अँड.सतीशचंद्र रोठें पाटील यांच्यासह 26 मोर्चेकरांवर गुन्हे दाखल.

ठाणेदार नरेंद्र ठाकरेंना पुरस्काराची मागणी.

इतर मोर्चांना परवानगी मिळते आमच्या का नाही…?

 

अमीन शाह

बुलडाणा ,

जातीय तणाव निर्माण करणाऱ्या नितेश राणेंना अटक करावी त्यांच्या सभांवर बंदी आणावी यासाठी बुलढाण्यात हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीने भर पावसात सहा सप्टेंबरला वीस ते पंचवीस हजार बांधवांचा विराट आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला.
कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत मोर्चा शांततेत संपन्न झाला. गणपती आणि गौरी महालक्ष्मी बाजारानिमित्त सामान्य नागरिकांना बुलढाणेकरांना त्रास होऊ नये. करिता मोर्चेकरांनी जयस्तंम चौक, मुख्य बाजार लाईन ,भगवान महावीर मार्ग, जनता चौक, कारंजा चौक हा नियोजित आपला मार्गही बदलला. इंदिरा नगर , नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, जयस्तंभ चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. नियोजित वेळेत मोर्चा पूर्णही झाला. वीस मिनिटांची सभा आणि त्वरित शिस्ट मंडळाने जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर केले.
परंतु मोर्चातील मागण्यांची पूर्तता करण्याऐवजी शासन प्रशासनाकडून राणेंना पाठीशी घालत मोर्चे करांनाच जेरबंद करण्याचा कुटील डाव शासन प्रशासनाने आखला आहे.
या घटनेचे त्रिवे पडसाद सामांन्यामध्ये उमटत आहे. तर गूलाम पोलीस प्रशासनाचा निषेधही जनसामांन्यातून होत आहे.
उलट पक्षी आजही नितेश राणेंच्या मोर्चांना, सभांना परवानगी मिळते. गुन्हे दाखल होऊनही अटक होत नाही. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. अशाने देशात आराजगता माजेल.
—————–

तर मोर्चाला परवानगी नाही. कोनीही मोर्चात सहभागी होऊ नये.असे मीडियावर बाईट देऊन जाहीर स्टेटमेंट देणारे बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांना उत्कृष्ट पोलीस निरीक्षक म्हणून पुरस्कृत करण्यात यावे. कारण यापूर्वी एकाही ठाणेदाराने अशा प्रकारे जाहीर रित्या बाईट देऊन आवाहन केलेले नाही. नियमानुसार नितेश राणेंवर नवीन कायद्यानुसार व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून बुलढाण्यातही गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी मोर्चे करांवर गुन्हा दाखल होत आहे.

——————————