Home बुलडाणा साखरखेर्डा येथील शिक्षक कलावंत सुनील गायकवाड दिसणार सोनी टीव्ही मराठी वर...

साखरखेर्डा येथील शिक्षक कलावंत सुनील गायकवाड दिसणार सोनी टीव्ही मराठी वर ,

104

 

अमीन शाह ,

बुलडाणा ,

साखरखेर्डा येथील कलावंत रील स्टार सहकार विद्या मंदिर चे शिक्षक सुनील गायकवाड हे सोनी मराठी टीव्ही वाहिनी वर सोमवार मंगळवार ला प्रसारित होणाऱ्या निवेदिता माझी ताई या मालिकेत पोलीस कॉन्सटेबल च्या भूमिकेत सह कलाकार म्हणून झळकणार आहेत साखरखेर्डा वासीयांसाठी ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल सुनील गायकवाड हे साखरखेर्डा येथील सहकार विद्या मंदिर येथे सह शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ते इन्स्टाग्रामवर रील बनवत असतात त्यांचे हजारो फालोवर्स आहेत ते उत्कृष्ट कलावंत असून त्यांनी या पूर्वी अनेक छोट्या भूमिका केल्या आहेत , लवकरच मी मोठ्या बैनर च्या चित्रपटात सुद्धा भूमिका करणार आहे मात्र यावर आत्ताच बोलणे उचित नाही असे सुनील गायकवाड यांनी पोलीसवाला ऑनलाईन मीडिया शी बोलतांना सांगितले ,