Home यवतमाळ आर्णी – केळापूर विधानसभा मतदार संघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढीचे संकेत..

आर्णी – केळापूर विधानसभा मतदार संघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढीचे संकेत..

55

उबाठा. व शिंदे गटाचे वाघही डरकाळी फोडणार…..


—————————————-
काँग्रेसमध्ये स्पर्धा नसल्याचे अंदाज..
—————————————-


राजू चव्हाण
घाटंजी (तालुका प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुक संपताच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे.आर्णी – केळापूर मतदार संघात भारतीय जनता पक्षात उमेदवारी करीता रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.महायुतीमध्ये आर्णी – केळापूर मतदार संघावर भाजपचा प्रबळ दावा असल्यामुळे याठिकाणी चांगलीच गर्दी झाल्याचे दिसत आहे.भाजपच्या चांगल्या पदावर असलेले नितीन मडावी यांनीही आपली दावेदारी घोषित केल्याने भाजपात गट पडताना दिसून येत आहे.

दुसरीकडे माजी आमदार प्रा.राजू तोडसाम यांचा मतदार संघात चांगला जनसंपर्क असल्याने ते सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह सक्रिय झाल्याचे दिसून येत असून ते नेमक्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे जरी गुलदस्त्यात असले तरी ते निवडणूक लढविणारच हे अटळ मानल्या जात आहे.
त्याचसोबत शिवसेना उबाठा वर असलेल्या सहानुभूतीची लाट याचा फायदा होईल हा दृष्टीकोन पुढे करून मनोहर मसराम तर शिवसेना शिंदे यांचा सत्तेतील फायदा होईल हा मानस बाळगणारे डॉ. विष्णू उकंडे हा गट सक्रिय झाला असून उमेदवारी करीता डरकाळी फोडण्याच्या तयारीला लागला आहे.आर्णी केळापूर मतदार संघात एसटी,बंजारा,कुणबी या समाजाचे मते मोठ्या संख्येत असले तरी विधानसभा एसटी करीता राखीव असल्याने लोकसभेप्रमाणे विधानसभेत जात पॅटर्न चालणार नसल्याचे बोलल्या जात आहे.विद्यमान आमदार डॉ.संदीप धुर्वे दोनदा एकदा प्रा.राजू तोडसाम यांच्या माध्यमातून भाजपला चांगले यश मिळाले.त्यामुळे परत या मतदार संघात भाजपलाच संधी मिळेल या आशेने भाजपमध्ये उमेदवारीकरीता रस्सीखेच सुरू झाली आहे.मागील पंच वार्षिकमध्ये केळापूर – आर्णी येथे प्रा.राजू तोडसाम यांना भाजपाने उमेदवारी नाकारली असतानाही त्यांनी बंड पुकारून निवडणूक लढविली मात्र ते पराभूत झाले असले तरी ते आता कोणत्यातरी पक्षाच्या उमेदवारी करीता तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे.त्यादृष्टीने त्यांचे कार्यकर्ते चांगलेच कामाला लागल्याचे दिसत आहे प्रामुख्याने ग्रामीण भागात त्यांची चांगलीच पकड आहे.दुसरीकडे नितीन मडावी यांनी उमेदवारीसाठी आर्णी – केळापूरच्या स्पर्धेत उडी घेतली आहे.नितीन मडावी हे वर्धा येथे वास्तव्यास असले तरी घाटंजी तालुक्यातील जांब हे जन्मगाव असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी मतदार संघात संपर्क वाढवण्याचा प्रयत्न चालविला आहे.यात कोणी राज्यातील तर कोणी केंद्रातील वरिष्ठांच्या संपर्कात आहे.प्रत्येक जण जोर लगाके हेशा करणार असल्याने कुणाचा जोर मजबूत आहे हे तर उमेदवारी घोषित झाल्यानंतरच समोर येणार आहे.
———————————-
*शिवसेना ऊबाठा व शिंदे गटाचे वाघ मैदानात..*
उबाठा वरील सहानुभूती व शिंदे यांचा सत्तेतील फायदा त्यामुळे दोन्ही गटाकडून उमेदवारी करीता दावा केल्या जाणार आहे.आर्णी केळापूर संघात सध्यातरी उबाठा कडून मनोहर मसराम तर शिंदे गटाकडून डॉ.विष्णू उकंडे यांचे नाव समोर येत आहे.वेळप्रसंगी महायुती यांची मैत्रीपूर्ण लढत व महविकास आघाडी यांची मैत्रीपूर्ण लढत झाल्यास फोडाफोडीचे राजकारण तसेच पाय ओढण्याचा कार्यक्रम चांगलाच रंगात येणार असल्याचे दिसून येत आहे.
———————————-
*काँगेस मध्ये स्पर्धा नसल्याची चर्चा..*
आर्णी – केळापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे, माजी मंत्री अड शिवाजीराव मोघे हे बराच काळ आमदार व मंत्री राहिल्याने त्यांची पक्षावर पकड असल्यामुळे त्यांनी स्पर्धक निर्माण होवू दिला नाही.मात्र आता त्यांचे चिरंजीव बाळासाहेब उर्फ जितेन्द्र मोघे यांना पुढे केल्याने केल्याने पक्षाकडे काही इच्छुकांची अर्ज गेल्याचे समजते.यात बाळासाहेब मोघे यांनी तशी तयारी सुद्धा चालविली आहे. यातच लोकसभेत माजी आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी काँग्रेसच्या उमेदवार खा. प्रतिभाताई धानोरकर यांना पाठिंबा जाहीर करून खुलेआम त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले.यात ते काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागणार तर नाही ना.. असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतांना दिसत आहे.