अमीन शाह
बुलडाणा ,
जिल्हा सामान्य रुग्णालयात आज एक अल्पवयीन मुलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला त्या नंतर एक इसम त्या गोंडस बाळाला घेऊन आम्ही या बाळास संभाळण्या साठी सक्षम नसल्याचे सांगत बुलडाणा पोलीस ठाण्यात गेला होता त्या नंतर बुलडाणा पोलिसांनी या घटनेची हकीकत जाणून घेऊन त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता आणि ती झालेल्या अत्याचारातून गर्भवती झाली होती ही हकीकत लोणार पोलिसांना सांगून त्या नराधमावर कार्यवाही करण्याचे सांगितले होते त्या नुसार लोणार पोलिसांनी आज लोणार तालुक्यातील गुंधा या गावातून एकास अटक केली ,
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महादेव केशव थापडे रा गुंधा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले व या बाबत बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला.
त्यामुळे सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली व तिने एका बाळास जन्म दिला. दरम्यान आरोपींविरुद्ध लोणार पोलीस स्टेशन मध्ये अपराध क्रमांक २७१/२०२४ कलम ३७६, ३७६ (२) (j),४५२, ५०६ भादवी सह कलम ४,५, (जे) (२), ६ लैंगिक बालकाचे अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखलपुण्यात आला.
आरोपीला अटक करत न्यायालया समोर उभे केले असता ४ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाल राठोड जमादार पंडित नागरे करीत आहेत.