Home बुलडाणा आंबासी येथे पसरले घाणीचे समराज्य रोगराई पसरण्याची शक्यता ,

आंबासी येथे पसरले घाणीचे समराज्य रोगराई पसरण्याची शक्यता ,

23

 

ग्राम पंचायत प्रशासन व आरोग्य प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष ,

 

एकनाथ माळेकर

चिखली तालुक्यातील मौजे आंबासी येथे गोविंद लक्ष्मण जाधव यांच्या घरासमोर कित्येक दिवसापासून पाण्याचे नाल्याचे गटार साचलेले आहे त्यांनी ग्रामसेवक यांना वेळोवेळी सांगून सुद्धा ग्रामसेवक यांनी दुर्लक्ष केल्याचे गोविंद जाधव यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे त्यांनी सरपंच व सचिव यांना वेळोवेळी तोंडीं सांगून सुद्धा यांनी त्या नाल्याचे कोणत्याही प्रकारचे काम केले नसल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे तसेच अंबाशी येथील आरोग्य सेवक हे सुद्धा या ठिकाणी येऊन फक्त पाहणी करून गेले त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही कोणाला पत्र सुद्धा दिले नसल्याचे दिसून येत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गटार साचून रोगराई पसरू शकते यामुळे जाधव यांनी वेळोवेळी सांगून सुद्धा सचिव सरपंच व आरोग्य सेवक यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आता सदर प्रशासनाचे कर्मचारी हे आमच्या मरणाची वाट पाहतात की काय असे जाधव यांनी दूरध्वनीवरून सांगितले आहे सदर निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली तथा बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे तर आंबसी येथील ग्रामसेवक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या तक्रारीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की सदर नाली ही खूप जुनी झाली असल्यामुळे व नालीमध्ये पन्नी व इतर केरकचरा असल्यामुळे सदर नालीमध्ये थोडाफार पाणी साचते आम्ही प्रत्येक वेळेवर नाली साफसफाई करतो व सदर नाली ही नवीन नाली बांधकामांमध्ये प्रस्तावित आहे त्यामुळे लवकरात लवकर नविन नाली बांधकाम करून पाण्याला योग्य तो उतार देण्यात येईल व पाणी साचणार नाही याची काळजी घेण्यात येईल असे ग्रामसेवक आंबासी यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले ,