तालुका प्रतिनिधी तिरोडा – अजय बर्वे
गोंदिया – काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिव स्वराज्य यात्रेचे कार्यक्रम प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
शिवस्वराज्य यात्रेचे औचित्य साधुन गोंदिया जिल्हा महिला आघाडी भाजपचे संयोजिका सौ मेघा सुनील बिसेन यांनी भाजपला रामराम ठोकत युवा नेते श्री रविकांत खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वावर व कार्यावर विश्वास ठेवत ड्रीम गार्डन लॉन, तिरोडा येथे प्रदेश अध्यक्ष मा. जयंत पाटील, खासदार डॉ अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल बाबु देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यावेळी मान्यवरांनी सौ मेघा सुनील बिसेन यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश केला व भविष्यातील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी खासदार खुशालचंद्र बोपचे, माजी खासदार मधुकर जी कुकडे, युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब, माजी आमदार रमेश बंग, निरीक्षक बजरंगसिंह परीहार, जिल्हा अध्यक्ष सौरभ रोकडे, युवा नेते रविकांत खुशाल बोपचे, दिलीप पणकुळे, कार्याध्यक्ष राघवेंद्रसिंह बैस, ओबीसी जिल्हा अध्यक्ष रुपेश मेंढे, अनु. जमाती जिल्हा अध्यक्ष शामराव उईके, महिला जिल्हा अध्यक्ष मंजुताई डोंगरवार, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष इरफान पटेल, विधानसभा अध्यक्ष ओमप्रकाश राहांगडाले, श्रीमती चंदाताई शर्मा, तालुका अध्यक्ष हेमराज अंबुले, तालुका अध्यक्ष प्रकाश बघेले, शहर अध्यक्ष रविंद्र वंजारी, महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्री केळवतकर, वैशाली तूरकर, दिपलता ठकरेले, किसान आघाडी अध्यक्ष धानसिंग बघेले, सामाजिक न्याय अध्यक्ष युवराज शहारे, ओबीसी अध्यक्ष खेमराज पटले, युवक अध्यक्ष रविकुमार कुर्वे, अनु. ज. सेल अध्यक्ष भोजराज उईके आदिंसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.