Home यवतमाळ ई-पीकपाहणीची नोंदणी शेतकऱ्यांवर लादू नका…. संभाजी ब्रिगेड,सोशल मीडिया काँग्रेस व “पत्रकार संरक्षण...

ई-पीकपाहणीची नोंदणी शेतकऱ्यांवर लादू नका…. संभाजी ब्रिगेड,सोशल मीडिया काँग्रेस व “पत्रकार संरक्षण समिती”ची कृषिमंत्र्यांकडे मागणी…

21

यवतमाळ – शेतकऱ्यांच्या शेतात कोणती पिके पेरली आहेत, त्याची अचूक नोंद व्हावी या दृष्टीने शासनाने ई-पीकपेरा नोंदणीची महत्त्वाकांक्षी योजना गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतली आहे. ही नोंदणी शेतकऱ्यांनीच त्यांच्या मोबाइलवरून नोंदवावी, अशी सक्ती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही तर शासकीय योजनांचा लाभ भेटणार नाही,असे सांगण्यात येत आहे. मात्र ही ई-पीक नोंदणी शेतकऱ्यांवर लादू नका,ही मागणी संभाजी ब्रिगेड तर्फे शेतकरी नेते सचिन मनवर यांच्यासह जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया काँग्रेस कमिटी,यवतमाळ कृष्णा पुसनाके यांनी कृषिमंत्री व महसूलमंत्र्यांकडे केली आहे.

सध्या ई-पीकपाहणीवरून शेतकऱ्यांना धमकाविण्यासारखीच भाषा शासकीय यंत्रणा वापरत आहे. ही ई-पीकपाहणी न केल्यास सात-बारा कोरे राहतील वगैरे सांगत आहेत.परंतु हे पूर्णपणे चुकीचे असून, पीकपेरा नोंदणीची कामे नेहमीच तलाठ्यांकडून होत होती. ती कामे तलाठ्यांकडून काढून शेतकऱ्यांनी करावीत, असा आग्रह शासनाने का करावा, मग राज्यभर नवीन तीन ते चार हजार तलाठी भरती कोणत्या कामांसाठी करण्यात आली आहे. जानेवारी २०२४ मध्ये ही कामे प्रत्येक गावात खासगी सहायक आणि तलाठ्यांमार्फत करण्यात येतील, असे शासनातर्फे सांगण्यात आले होते, त्याचे काय झाले,असा सवाल निवेदनाद्वारे श्रीकांत देशमातुरे,विनोद पत्रे,दीपक यंगड, वसीम शेख,रवी चरडे,सचिन मनवर,कृष्णा पुसनाके,प्रा.पंढरी पाठे,प्रकाश कांबळे,अनिल चवरे आदींनी केला आहे.