घाटंजी – दिनांक १३सप्टेंबर २०२४ रोजी पांढरकवडा येथे भाजपा आदिवासी आघाडी जिल्हा यवतमाळ च्या वतीने नितीन मडावी प्रदेश महामंत्री आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य यांचा नेतृत्वात खा. राहुल गांधी ( विरोधी पक्षनेता) यांनी अमेरिका येथील वॉशिंग्टन मधील जार्ज टाऊन विद्यापिठामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत चर्चा करतांना कांग्रेस सरकार सत्तेत आल्यास अनु. जमाती अनु. जाती. इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण रद्द करू असे सांगितले त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चामध्ये आर्णी – ८० विधानसभेतील हजारों भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात सामील झाला होता. सदर निषेध मोर्च्या मित्र क्रिडा मंडळ मैदान जवळुन निघून बिरसा मुंडा चौक, लोहार लाईन,अग्रसेन चौक,शिबला पांईट,आठवडी बाजार,मेन लाईन, येथुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आला. तिथे डॉ. विवेक अंगाइतकर (संयोजक , प्रदेश वैद्यकीय आघाडी) संतोष बोडेवार ( ता. अध्यक्ष. ओबीसी आघाडी). बंटि जुवारे नगरसेवक पांढरकवडा मोहन जाधव ( जिल्हाध्यक्ष भाजपा विमुक्त भटक्या जमाती) नागोराव गेडाम ( जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी यवतमाळ) सर्वांनी आपले विचार व्यक्त केले आणि आपल्या भाषणातून खा. राहुल गांधी यांचा जाहिर निषेध करण्यात आला.त्यानंतर मा. नितीन जी मडावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कांग्रेस पक्षावर सडकुन टिका केली . खा.राहुल गांधी यांच्या,आजोबा,वडिल यांनी सगळ्यांनी अनु.जमाती अनु.जाती. इतर मागासवर्गीय यांचा तिरस्कार केला ते नेहमी आरक्षण विरोधी भुमिका घेत होते. खा राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे आदिवासी बहुजन समाजाच्या तिव्र भावना दुखावल्या आहे. आदिवासी समाज कांग्रेसला कधीही माफ करणारं नाही या शब्दात टिका केली.
या निषेध मोर्चाच्या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश उग्गेवार ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले.तर आभार प्रदर्शन दयानंद सोयाम सरपंच मराठवाकडी तथा जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी आघाडी यवतमाळ यांनी केले.या कार्यक्रमांमध्ये भाजपा पदाधिकारी संतोष चिंतावार जिल्हा सचिव भाजपा, समीर मुस्तीलवार, उमाशंकर कनोजे, धिरज शर्मा उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष, स्वप्नील मंगळे, जिल्हा सरचिटणीस आदिवासी आघाडी यवतमाळ, तुळशीराम कुळमेथे, सुभाषजी चांदेकर, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा आदिवासी आघाडी, पुंडलिक शेडमाके झुली माजी सरपंच, यशवंत काळे भाजपा किसान आघाडी,सुनील बोकिलवार ज्येष्ठ नेते भाजपा,मंगेश वारेकर ज्येष्ठ नेते भाजपा शेखर जैस्वाल शहर सरचिटणीस भाजपा,दिलीप जी मुथा माजी शहर अध्यक्ष भाजपा,नारायण भाणारकर,रमेश निलगिरवार अनील पवार,अनील पिंपळे ज्येष्ठ भाजपा आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.