यवतमाळ – राजमाता माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतिसूर्य महात्मा फुले,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,हरितक्रांतेचे प्रणेते वसंतराव नाईक,डॉ.पंजाबराव देशमुख,यांच्या चरणी नतमस्तक होवून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यवतमाळ येथील आझाद मैदानात जयस्तंभा समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली.
सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपली ही लढाई असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही उपोषकर्ते अन्नाचा कण खाणार नाही.जीव गेला तरी बेहत्तर पण मागे हटणार नाही अशी प्रखर भूमिका प्रा.पंढरी पाठे यांनी मांडली.
यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आयोजित अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.ही लढाई सचिन मनवर ची नसून तमाम शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची आहे.त्यामुळे आता नुसता पाठिंबा देऊ नका तर या आंदोलनात सहभागी व्हा,असे आवाहन यावेळी केले,आपल्या आंदोलनाचा श्वास सोयाबीन कापूस आहे.आता आपला कोणी नेता नाही,त्यामुळे आपला लढा आपल्यालाच पुढे न्यावा लागणार आहे. आता सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचे नाही, असे सांगत हे आंदोलन टप्याटप्याने पेटणार असल्याचे कृष्णा पुसनाके यांनी सांगितले.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रा.पंढरी पाठे पुढे म्हणाले की,हे सरकार वारंवार सांगत असते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतो. त्यामुळे छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंना स्मरून हे आंदोलन करीत आहोत,या सरकारला सद्बुद्धी दे,अशी प्रार्थना केली. सोयाबीन-कापसाच्या आंदोलनाचे केंद्र आता यवतमाळ करायचे आहे,का तर महाराष्ट्रात कापूस पिकाचे सर्वाधिक जास्त उत्पादन हे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते.असे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी स्पष्ट केले.सोयाबीन-कापूस तसेच पीकविमा, शेतकरी, पीकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के नुकसानभरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या न्यायहक्काच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.त्यामुळे या आंदोलनाचा राजकीय अर्थ लावू नका.जोपर्यंत आंदोलन संपत नाही,तोपर्यंत मी राजकीय भाष्य करणार नाही, असेही पाठे यांनी सांगितले.अंबानी-अदानीचे कर्ज माफ करायला सरकारजवळ पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला पैसा नाही का? असा सवाल यावेळी केला.
यावेळी शेतकरी प्रकाश कांबळे,नंदू कुटे,निलेश आगलावे,अभय अनासने, सखुबाई कांबळे,गजानन ढोरे,देवेन्द्र वावरकर,प्रशांत कुटे,शिव कुटे,प्रतीक इंगोले,रुपेश माकडे,निनाद सुरपाम, प्रा.प्रवीण देशमुख,बाळासाहेब मांगुळकर,जयसिंह चव्हाण,अनिल चवरे,सय्यद साहेबराव,इत्यादी उपस्थित होते.
कोट……
अबकी बार सोयाबीन ६ हजार पार”
गावगाड्यातील व खेड्यापाड्यातील शेतकरी,
शेतमजुरांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन दिले पाहिजे.तसेच शहरी भागातील नागरिकांनी देखील शेतकऱ्यांच्या लढाईला समर्थन देणे गरजेचे आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत ज्यांना जसे जमेल त्या पद्धतीने या आंदोलनाला पाठिंबा व समर्थन द्या,व्हिडीओ करा आणि सोशल मीडियावर ते व्हायरल करा,”अबकी बार सोयाबीन ६ हजार पार” अशी एक मोहीम सोशल मीडियावर राबवा.
कृषी अभ्यासक – प्रा.पंढरी पाठे.
कोट…
शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा अद्याप जमा झाला नाही.नेते तारखांवर तारखा देत आहेत, ३१ ऑगस्टपर्यंत पीकविम्याची रक्कम जमा होईल, असे नेते सांगत होते. तोपर्यंत आपण वाट पहिली, मात्र आता आपली सहनशीलता संपली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. ही लढाई माझी एकट्याची नसून सर्व शेतकऱ्यांचा हा लढा आहे. त्यामुळे सर्वांना या आंदोलनात सहभागी व्हावे लागणार आहे.
शेतकरी नेते – सचिन मनवर.
कोट….
यवतमाळ येथे आंदोलन सुरू असले तरी या आंदोलनाची धग राज्यभर पोहोचणार आहे.आणि राज्यभरात विविध ठिकाणी वेगवेगळी आंदोलने केले जातील.या आंदोलनादरम्यान उपोषणकर्त्यास कमी-अधिक झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहील.
उपोषणकर्ते – कृष्णा पुसनाके.