Home मराठवाडा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे महा-शिबिर संपन्न…!

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे महा-शिबिर संपन्न…!

145

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. ०७ :- किनवट दि.६ रोजी किनवट पोस्ट ऑफिस येथे डाक अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली डाक निरीक्षक किनवट व पोस्ट मास्तर किनवट यानी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना डाक निरीक्षक किनवट अभिनव सिन्हा म्हणाले की पोस्ट बॅंकेमुळे ग्रामीण भागातील महिलां मोठ्या संख्येने बँकेचे आर्थिक व्यवहार करणे सोपे झाल्याने महिला मोठया संख्येने पोस्ट बँकेत गुंतवणूक करीत आहेत असे आपल्या भाषणात सांगितले.

या कार्यक्रमाला संजय गांधी निराधार लाभार्थी, व्यापारी, विद्यार्थी,बचत गटांच्या महिला, व गावातील महिला व पुरुषांची गर्दी केली होती.
पुढे बोलताना अभिनव सिन्हा म्हणाले की किनवट तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना काही दिवसा मध्ये युध्द पातळीवर काम करून तहसिल ऑफिस ला खाते क्रमांकसह यादी दिली आहे.काही दिवसांनी अनुदान जमा झाल्या बरोबर पोस्टमन घर पोच पैसे वाटप केले जाईल असे म्हणत होते.पुढे म्हणाले की पोस्ट बँक खात्यात वीजबिल, टेलिफोन बिल,मोबाईल, टिव्ही रिचार्ज करता येतो.तसेच पैसे भरणे,उचलणे,पाठवणे आणि विमा हापता, सुकन्या समृध्दी खात्याचे पैसे घरी बसून भरता येतो असे आपल्या भाषणात अभिनव सिन्हा यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार हे होते त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना मिशन बालिका शक्ती सुकन्या समृध्दी खाते योजना संदर्भात माहिती देताना म्हणाले की मुलींचे स्वप्न साकार करण्यासाठी मुलींच्या आई व वडिलांनी सुकन्या समृध्दी खाते योजनेचा लाभ घ्यावा कारण या योजनेची सुरवात झाली आहे पण ग्रामीण भागातील नागरिकांना या योजना ची माहिती पूर्णपणे मिळालेली नाही.
या करिता डाक अधीक्षक नांदेड यांनी नांदेड जिल्ह्यात ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.
यांचा मुलींच्या आई व वडिलांनी या योजनेचा लाभ घेतल्यास यांचा भविष्यात मुलीला याचा मोठा फायदा होणार आहे असे सुरेश सिंगेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या शिबिरात हजारो इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे नागरिकांचे खाते उघडण्यात आले असल्याने सिंगेवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोस्ट मास्तर सातपिलेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रोशन भासलेराव यांनी केले आहे.