माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे,यांची आंदोलन स्थळी भेट..
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार बच्चू कडू यांच्याशी फोनवर सकारात्मक चर्चा…
प्रतिनिधी | यवतमाळ
उपोषणकर्ते प्रा.पंढरी पाठे,सचिन मनवर,कृष्णा पुसनाके यांचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी १४ सप्टेंबरला दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकरी पुत्रांनी व भूमीहीन मजुरांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
शनिवारी १४ सप्टेंबरला जिल्हा उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे तहसीलदार गोरलेवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.यावेळी प्रा.पंढरी पाठे यांची बच्चू कडू, व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनवर चर्चा झाली.परंतु तोडगा निघाला नाही. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांच्या चमूने त्यांची तपासणी केली. त्यावेळी रक्तातील साखर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रशासनातर्फे प्रा.पाठे यांना अन्नत्याग मागे घेण्याची विनंती केली. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा….
बिरसा ब्रिगेड,मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड,आव्हान संघटना,प्रहार जनशक्ती पक्ष, ऑल इंडिया पॅंथर सेना,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी शरच्चंद्र पवार पक्ष,नॅशनल आदिवासी युथ असोसिएशन, तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला व या आंदोलनाकरिता अधिक संख्येने उपस्थित राहण्याचे शेतकऱ्यांना,शहरातील नागरिकांना आव्हान केले.
आंदोलनाकरिता जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती….
माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे,जिल्हा परिषद यवतमाळचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड,माजी विधानपरिषद आमदार संदीप बाजोरिया,शेतकरी नेते प्रा.घनश्याम धरणे, प्रा. प्रवीण देशमुख,प्रा. बबलू भाऊ देशमुख,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा निशाताई बुटले,महिला काँग्रेसच्या सरचिटणीस आवारीताई,मनीषाताई तिरणकर कर,इत्यादी.
कोट….
शेतकरी कुटुंबातील युवा तरुणांनी एकत्र येऊन यवतमाळ येथील आझाद मैदानात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले याची ठिणगी आता राज्यभर पडेल.आणि सरकारला कापूस व सोयाबीन पिकाच्या भाववाढी संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा या आंदोलनाचा मोठा उद्रेक निर्माण होईल.
शिवाजीराव मोघे –
माजी सामाजिक न्याय मंत्री,महाराष्ट्र राज्य.