Home यवतमाळ 20 सप्टेबरला कलावंतांचा आक्रोश मोर्चा

20 सप्टेबरला कलावंतांचा आक्रोश मोर्चा

4

चलो समता मैदान, चलो समता मैदान यवतमाळ

यवतमाळ – राज्यातील दहा लाख कलावंतांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कलावंत आर्थिक विकास मंडळ गठीत करावे* ह्या प्रमूख मागणीसह अन्य महत्वपूर्ण मागण्या मंजूर करण्यासाठी अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती च्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन महागायक तथा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सोमनाथ दादा गायकवाड ह्यांचे सभर्थ नेतृत्वात दि. 20 सप्टेबर रोजी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वृध्द कलावंताचे गेल्या तीन वर्षापासून रखडून पडलेले मानधन प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत, जिल्हानिहाय मानधन लाभार्थी ईष्टांक वाढवून दूप्पट करावे आणि त्यामधे महीला कलावंतांना 50टक्के आरक्षण ठेवावे,कलावंतांना मानधनासाठीची वयाची व ऊत्पन्नाची अट नसावी, बेघर कलावंतांना प्राधान्य देवून घरकूल मंजूर करावे, कलावंतांना प्रबोधनासाठी राज्यभर एस.टी.बस प्रवास सवलत द्यावी,यूवा कलावंतांना पारंपारिक कला प्रशिक्षणासाठी शिष्यवृती द्यावी
कला जोपासण्यासाठी तालूका स्तरावर कला संकूल बांधून द्यावेत.बॅड पथकाची पारंपारिक कला जोपासण्याठी व कर्ण कर्कश ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी डि.जे.साऊड सिस्टीम वर कायम बंदी आणावी,संघटीत कला प्रवर्गातील भजन गायन,कला पथके,किर्तनकार प्रबोधनकार ,नाट्य संच,ई कलावंताना साहित्यासाठी अर्थ सहाय्य द्यावे ई कलावंताच्या न्याय्य मागण्या सरकारने मंजूर कराव्यात ह्या मागणीकरीता भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील समस्त भजन गायन मंडळी,किर्तनकार, प्रबोधनकार साहित्यीक,कवी , शाहीर , वारकरी ई.नी ह्या आक्रोश मोर्चामधे मोठ्या संख्येनी सामील व्हावे असे आवाहन अ.भा.कलावंत समितीच्या वतीने राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे,विदर्भ अध्यक्ष मनोहरराव शहारे,कार्याध्यक्ष सिध्दार्थ भवरे,जिल्हाध्यक्ष अविनाश बनसोड,जिल्हा महीला आघाडी प्रमूख मृणालिणी दहीकर,जिल्हा सचीव रमेश वाघमारे,जिल्हा संघटक अशोक भाऊ ऊम्रतकर,अध्यक्ष जिल्हा बॅन्ड असोशिएशन देवेन्द्र वानखडे, भारत भाऊ खडसे,वासूदेवराव तेलंगे , तथा समस्त तालूका प्रमूख ई.नी केले आहे.