मलकापूर पांग्रा ता ,सिंदखेडराजा
फकीरा पठाण ,
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथे सामाजिक सलोख्यात अग्रेसर असलेले साई एकता गणेश मंडळाने मोठा गाजा वाजा ना करता टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाला निरोप दिला यात बालगोपाळांसह गणेश भक्तांचा टाळ मृदंगाच्या गजरात उत्साह दिसून आला गणेशोत्सवाच्या काळात 10 दिवस साई एकता गणेश मंडळाकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यात संगीत खुर्ची खो-खो लिंबू चमचा लहान मुलांचे मुलींचे नृत्य नाटक भजनाचा व कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले या ही वर्षी साई एकता गणेश मंडळ व ईद-ए-मिलादून नबी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम युवकांनी रक्तदान केले त्यातून साई एकता गणेश मंडळाचे पुन्हा जातीय सलोख्याचे प्रतिक दिसून आले गावातील जय मल्हार गणेश मंडळ व पांगरा येथील नवयुवक गणेश मंडळ यांनीही वाजत गाजत मोठ्या उत्साहाने गणरायाला निरोप दिला गावातील साई एकता गणेश मंडळ मिरवणूक जामा मस्जिद येथे पोहोचल्यानंतर मुस्लिम बांधवाकडून फुलांचा वर्षाव करून त्याचे स्वागत करण्यात आले या मिरवणुकीमध्ये साई एकता गणेश मंडळ गणेश भक्त सह गावातील नवयुवक मुस्लिम बांधव ही उपस्थित होते यावेळी साखरखेडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निवृत्ती पोफळे व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
गणेश मंडळाचा जातीय सलोखा
दिनांक 17 रोजी साई एकता गणेश मंडळ व ईद-ए-मिलादुन्नबी ग्रुप यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यात एकूण 60 हिंदू मुस्लिम बांधवानी रक्तदान केले साई एकता गणेश मंडळाचा या विविध कार्यक्रमातून जातीय सलोखा दरवर्षी अबाधित राहतो हे मात्र खरे या वेळी रक्तदान करणाऱ्या युवकांना प्रमाणपत्राचे ही वितरण करण्यात आले ,