Home पुणे पतीने मोबाइल घेऊन न दिल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

पतीने मोबाइल घेऊन न दिल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

24

 

पोलीसवाला टीम

पतीने नवीन मोबाइल घेण्याचा हट्ट न पुरविल्याने रुसलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काळेवाडीतील पवनानगर पुणे येथे ही घटना घडली. शिवानी गोपाल शर्मा (वय २०, रा. पवनानगर, काळेवाडी, मूळ गाव उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी आणि गोपाल शर्मा यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ते काळेवाडीत वास्तव्यास होते. गोपाल खासगी कंपनीत सीएनसी मशीन ऑपरेटर म्हणून काम करतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांची पत्नी शिवानी नवीन मोबाइल घेण्याचा हट्ट करत होती. ‘तुम्ही कामावर गेल्यानंतर घरी मी एकटीच असते, मोबाइलमुळे माझा वेळ जाईल’, असे तिचे म्हणणे होते. मात्र, पैसे नसल्याने पगार झाल्यावर नवीन मोबाइल घेऊ, असे गोपाल यांनी सांगितले. त्यावरून शिवानी रुसली होती रागात होती रागाच्या भरात तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ,