अस्लम हिरीवाले
चिखली : चिखली शहरातील खामगाव चौफुली वरील वळणावरून खामगावकडे जाणाऱ्या बारा चाकी चाकी लोखंडी सळया भरलेला ट्रक एका 70 वर्षीय वृद्धाच्या अंगावरून गेल्याने सखाराम मल्हारी नावाचा वृद्ध जागीच ठार झाला आहे.
चिखली शहरातून चार ठिकाणी जाणाऱ्या खामगाव चौफुली या ठिकाणी दिनांक 21 सप्टेंबर 2024 च्या सव्वा तीन वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा कडून आलेल्या 12 चाकी ट्रक क्रमांक एम एच 41 एयु 25 74 ने चौफुलीवर असलेल्या वृद्ध जोडप्यापैकी सखाराम मल्हारी नामक 70 वर्षीय वृद्धास चिरडले आणि ट्रक चालकांनी ट्रक त्या ठिकाणाहून दोनशे फुटावर नेऊन उभा केला लोकांनी आढळरावडा करून त्याचा पाठलाग करताच ट्रक चालकांनी ट्रक उभा करून त्या ठिकाणाहून तो पळून गेला. यामुळे बर काही काळ ट्राफिक जाम झाली होती मात्र ट्रकला चाबी असल्याने पोलिसांनी दुसऱ्या ड्रायव्हरच्या साह्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावला व रस्ता रहदरीसाठी मोकळा केला.
मृतक इसम सखाराम मल्हारी नामक मूळ उत्तरादा या ठिकाणचा असून हल्ली मुक्काम त्याची पेठ आहे. मात्र तो चिखली शहरांमध्ये आपल्या आजारी पत्नीसह शहरातील मुख्य रस्त्यावर सायकलच्या माध्यमातून विळे व इतर साहित्य विकण्याचा व्यवसाय करत होता घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तात्काळ पोलिसांना पाठवून मृतदेह त्या ठिकाणी उचलून घेतला आणि रस्ता मोकळा केला.