Home यवतमाळ ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ अन्नत्याग -यवतमाळ येथे सुनयना येवतकर (अजात) यांच्या नेतृत्वात आंदोलन

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ अन्नत्याग -यवतमाळ येथे सुनयना येवतकर (अजात) यांच्या नेतृत्वात आंदोलन

15

यवतमाळ, ता. २२: मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण अबाधित राहावे, या मागणीसाठी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे, ऍड. मंगेश ससाने, प्रा. लक्ष्मण हाके हे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ ओबीसी व भटके विमुक्त यांच्या विविध संघटनांनी घोषणा देत यवतमाळ येथे मध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या बाजूला रविवारी, (ता. २२) अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सुनयना संजय येवतकर (अजात) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. ‘जो ओबीसी की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशा घोषणांनी महात्मा फुले चौक दुमदुमून गेला होता.

मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये येऊन मागण्या पूर्ण करून आंदोलन सोडवावे, अशी मागणी आंदोलक करीत आहे.
आंदोलनास विविध ओबीसी संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. ओबीसी कर्मचारी संघटना, भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन, ओबीसी जनमोर्चा, महात्मा फुले समता परिषद, सत्यशोधक महिला अध्यापक विचार मंच, सत्यशोधक महिला विचार मंच, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, ओबीसी बहुजन आघाडी, क्रांतीज्योती महिला मंडळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, क्रांतीज्योती युवा मंडळ. यावेळी उपस्थितांमध्ये प्रदीप वादाफळे, निशिकांत थेटे, ज्योती निरपासे, शिल्पा घावडे, शैलेश गुल्हाने, सुनिता काळे, चैतन्या गोडे, शकीला अन्सारी इत्यादी उपस्थित होते.

–===—==कोट
“ओबीसींचे हे आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, तर आपले हक्क जपण्यासाठी असल्याची भूमिका यावेळी येवतकर यांनी व्यक्त केली. शासनाने प्रथम जातनिहाय जनगणना आणि नंतरच आरक्षणाचे निर्णय घ्यावेत, २००४ पासून दिलेल्या चुकीच्या जात प्रमाणपत्रांची तपासणी करावी, या माण्या करण्यात आल्या आहेत.”
-सुनयना संजय येवतकर (अजात)