Home यवतमाळ मेळघाटातील आदिवासी बांधवांना दिवाळी भेट -एम. एच.29 हेल्पिंग हँडचा उपक्रम, शालेय किट...

मेळघाटातील आदिवासी बांधवांना दिवाळी भेट -एम. एच.29 हेल्पिंग हँडचा उपक्रम, शालेय किट व कपड्यांचे वाटप

30

यवतमाळ, दि. 22 : मेळघाटातील आदिवासी बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून दरवर्षी येथील एम. एच. 29 हेल्पिंग हॅन्ड व वन्यजीव संघटनेच्या वतीनेआदिवासी बांधवांना शालेय किट, तसेच लहान मुलांना कपड्यांचे वाटप केले जाते.

हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे. या वर्षी देखील तो राबविण्यात येईल अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष निलेश मेश्राम यांनी दिली. एक हात मदतीचा, दर्शन घडवू माणुसकीचे, असे या उपक्रमाचे ब्रीद वाक्य आहे. यासंदर्भात नियोजनाची बैठक रविवारी तारीख 22 येथे पार पडली. गेल्या पाच वर्षापासून मेळघाटातील मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांसोबत संघटनेचे कार्यकर्ते दिवाळी साजरी करतात. त्यांना शालेय किट, लहान मुलांना कपडे आणि दिवाळीचा फराळ वाटप केला जातो. या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी आनंदात साजरी केली जाते. यावर्षीही हा उपक्रम राबवण्यात येईल, अशी माहिती एमएच २९ या संघटनेचे अध्यक्ष निलेश मेश्राम यांनी दिली. यावेळी जीत पाटील, अंकित पवार, पवन आंबेडकर, गट्टू भगत, निलेश मेश्राम, प्रा. पंढरी पाठे, अभिजीत वाघ, पृथ्वीराज चव्हाण, अंकित कोथळे, सत्यम डोंगरे, विकास राठोड, मोरेश्वर मोरे, पायल लोहकरे, कल्याणी बोरकर, तेजस्विनी मेश्राम, वैष्णवी मेश्राम, धनश्री गोरे, त्रिशूल चपारीया तसेच वन वन्य जीव व सर्पमित्र संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.