Home यवतमाळ रुग्ण व रुग्णसेवकांच्या समस्या संदर्भात रुग्णसेवक समितिच्या अन्नत्याग आंदोलनास सुरुवात…

रुग्ण व रुग्णसेवकांच्या समस्या संदर्भात रुग्णसेवक समितिच्या अन्नत्याग आंदोलनास सुरुवात…

10

यवतमाळ जिल्ह्यात एकूण १६ तालुके आहेत.व या तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी बहुलभागातून तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येत असतात.पण या रुग्णांची नेहमी हेळसांड होते. त्यांना हव्या त्या सुविधा रुग्णालयाच्या माध्यमातून पुरविल्या जात नाहीत.

लोकप्रिनिधी व अधिष्ठाता यांना वारंवार सूचना देऊनही शासकीय रुग्णालयतील समस्या न सोडवल्याने उपोषणकर्ते संघपाल बारसे यांच्या नेतृत्वात,रुग्णसेवक समिती,यवतमाळ च्या वतीने अन्नत्याग आंदोलन वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ येथे (ता.२३ सप्टेंबर,२०२४) सुरू करण्यात आले.
जास्तीत जास्त संख्येने या आंदोलना मध्ये सहभागी होण्याचे आव्हान रुग्णसेवक समिती,यवतमाळ च्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी उपोषणकर्ते संघपाल बारसे,सहकारी संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सचिन मनवर, सुकांत वंजारी,कमलेश बघेल,सूरज पाटील,सुरज खोब्रागडे,मनीषा तिरणकर इत्यादी उपस्थित होते.