Home यवतमाळ ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस जिंकेपर्यंत...

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी सुरू करण्यात आलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस जिंकेपर्यंत लढणार – सुनयना येवतकर

21

यवतमाळ ता.२३ – मागील एका दिवसांपासून यवतमाळ मध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या बाजूला महात्मा फुले चौकात ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये त्याचबरोबर विविध मागण्या घेऊन मागील एका दिवसापासून उपोषणकर्त्या सुनयना येवतकर यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला.यामध्ये ओबीसी कर्मचारी संघटना,भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन,ओबीसी जनमोर्चा,महात्मा फुले समता परिषद,सत्यशोधक महिला अध्यापक विचार मंच,संभाजी ब्रिगेड,सत्यशोधक महिला विचार मंच,सावित्रीबाई फुले महिला मंडळ,ओबीसी बहुजन आघाडी,क्रांतीज्योती महिला मंडळ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,क्रांतीज्योती युवा मंडळ,शेतकरी संघर्ष समिती,बिरसा क्रांती दल,माळी समाज संघटन,धनगर महासंघ, अनुसूचित जाती जमाती संघ, समता पर्व प्रतिष्ठान,भारतीय जैन संघटना,बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,कास्ट्राईब कर्मचारी संघटना,शेतकरी संघटना व ईत्यादी संघटनेनी पाठिंबा दर्शविला. यावेळी संजय कावलकर,सुरेश तिरशिंगे,विवेक घावडे,जनार्धन मनवर,नारायण थुल,श्याम बबूतकर,मनोज गोरे,अर्चना खुणे इत्यादी उपस्थित होते.