चिखली देऊळगावराजा मार्गावर घडला अपघात ,
अनिल दराडे
सिंदखेडराजा ,देऊळगावराजा प्रतिनिधी
भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसने समोरच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. त्यांमध्ये झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी मेरा खुर्द फाटया लगत शिंगणे यांच्या घासलेट डेपो जवळ घडली.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली ते जालना नॅशनल हायवे रोडचे चौपदरी सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच पाच वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे त्यामुळे या हायवे रोडवरून लहान मोठी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने रोडवरील ठिकठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे . त्यामध्ये २३ सप्टेंबर रोजी दुपारी संभाजी नगर ते नागपूर जाणारी एसटी बस क्र एम एच १४ के क्यू ४९६७ ही भरधाव वेगात धावत होती. त्याच एसटी बस समोर रोडवर समोर धावत असलेली मोटार सायकल क्र एम एच २८ ए ए ४१६२ वर केळवद येथील तीन गावाकडे जात होते.
मात्र अचानक पाठीमागून भरधाव वेगात धावणाऱ्या एसटी बस चालकाने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. बसलेल्या धडकेत मोटार सायकल वरील तीन जण शेतात जावून आदळले आणि दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला ही घटना मेरा खुर्द फाट्यालगत दिपक शिंगणे यांच्या घासलेट डेपो जवळ घडली या घटनेची माहिती रोडच्या आजु बाजूला शेतकऱ्यांनी तात्काळ अंढेरा पोलीसांना दिली असता लगेच ठाणेदार विकास पाटील यांच्या सह बिट जमादार कैलास पर्वत व पोलीस कर्मचारी घटनास्थळी हाजर झाले. पंचासमक्ष पंचनामा केला असता मृतक राजु भीमराव खोलगडे वय ३५ वर्ष, नंदू भगवान सगट वय ३० वर्ष, आणि जखमी ज्ञानेश्र्वर मदन जामोळकर वय ३४ वर्ष सर्व राहणार केळवद ता चिखली या तीन जंनाना तात्काळ चिखली येथील रुग्णालयात हलविले आहे.