गायत्री शिंगणे यांचा काकावर पलटवार ,
सिंदखेडराजा अनिल दराडे
काल आमदार डॉ , राजेंद्र शिंगणे साहेब जसं म्हणाले मी उभा राहिलो की लोक पक्ष विचारत नाही
का विचारत नाही .???
तुम्हाला स्वतःला माहित नाही की तुम्हाला कोणत्या पक्षाकडून लढायचे??
दुसरा मुद्दा असा ते म्हणाले की भावी आमदारांच्या लाईन लागलेल्या आहेत मतदारसंघात लोकशाही आहे उभं राहायचं अधिकार सर्वांना आहे
तुम्ही जेव्हा आमदारकीला उभे राहिले त्याच्या आधी सुद्धा तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका इतर कोणत्याच निवडणूक लढल्या नव्हत्या तुम्ही सुद्धा डायरेक्ट आमदारकीला उभे होते मग आजचा प्रश्न तुम्ही मला टोमणा मारला कोणत्याच गोष्टीचा अनुभव नाही आणि चालले आमदार होयला .!!
मला तरी असं वाटतं यांना कोणी कोणत्या पक्षात घ्यायला तयार नाहीये म्हणून हे लोकांना म्हणतात की जनता माझ्या पाठीशी आहे आणि मला कोणत्या पक्षाची गरज नाहीये मग एक काम करा तुम्ही या वेळेस अपक्ष हा फॉर्म भरा बघू तुम्हाला कोण किती साथ देतो
गेल्या २५ वर्षात व मागच्या या पाच वर्षात साहेबांनी पाच केलेले ठोस सार्वजनिक कामे सांगावित कि ज्या कामामुळे मतदार संघाचा विकास झाला…
उगच विकासाच्या गप्पा मारु नये …
त्यांच्या सोबत राहणारे कार्यकर्तेवर आज हलाकिच्या परिस्थितीत आहे..
काय दिलं कार्यकर्त्यांनां
मतदार संघाला काही देऊ शकले नाही ते कार्यकर्त्यांना काय देणार ..
असो घोडा मैदान समोर आहे ..
भास्कररावजी शिंगणे (आजोबा) यांनी सुरू केलेले कारखाना सूतगिरणी हे सुद्धा साहेब सांभाळू शकले नाही तर त्यांनी बाकीच्या गप्पा तर कमीच मारावे
माझ्यावर का इतर भावी आमदारांवर टीका करण्यापेक्षा साहेबांनी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे हे माझं मत आहे
जनतेला येडं काढणं बंद करा आणि मी तर ठोसपणे सांगू शकते की एवढ्या 25 वर्षात का एवढ्या पाच वर्षात साहेबांच्या काळात फक्त त्यांची मलिदा घ्या हे खुश आहे व त्यांचे सोडलेले दोन चार पाच कार्यकर्ते
तुम्ही जर माझे नाही होऊ शकले तर तुम्ही जनतेचे कधी होणार