Home बुलडाणा शिंदी येथील अवैध दारू विक्री करणारी महिला ६ महिन्यांसाठी तडीपार ,

शिंदी येथील अवैध दारू विक्री करणारी महिला ६ महिन्यांसाठी तडीपार ,

45

 

 

महिलेवर ४५ गुन्हे दाखल

 

सिंदखेडराजा,

उपविभागीय दंडाधिकारी सिंदखेडराजा यांच्या आदेशावरून साखरखेर्डा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शिंदी गावातील अवैध दारू विक्रेत्या महिलेस सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आल्याने परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सिंदी येथील लक्ष्मीबाई मारोती वाघमारे वय 53 वर्ष या बऱ्याच वर्षा पासून गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असून, तिच्याविरुद्ध साखरखेडा पोलीस ठाण्यात 45 गुन्हे दाखल आहेत बेकायदेशीर दारू आणि खाजगी मालमत्तेवर ताबा करणे वेळो वेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही ती अवैध दारू विकत होती, त्यामुळे तिच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५६(१), (ब) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. 02/2023 सदर महिले विरुध्द प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे बुलडाणा यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे सिंदखेडराजा यांच्या न्यायालयात पाठविला होता.
यावर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे सिंदखेडराजा लक्ष्मीबाई मारोती वाघमारे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१), (ब) अन्वये वाशिम बुलडाणा व लगतच्या जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 23/09/2024 रोजी लक्ष्मीबाई मारोती वाघमारे वय 53 वर्षे रहिवासी सिंदी या तडीपार कालावधीत अकोला जिल्ह्यात राहतील असा आदेश देण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली
ठाणेदार गजानन करेवाड, जमादार नितीनराजे जाधव
राजेश गीते, संजय भुजबळ यांनी ही कारवाई केली
आज झालेल्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.