Home यवतमाळ ग्राहक संरक्षण संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी मनिष शिरभाते यांची निवड.

ग्राहक संरक्षण संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी मनिष शिरभाते यांची निवड.

20

यवतमाळ / प्रतिनिधी

ग्राहकांच्या हक्कासाठी लढणारी, बिगर राजकीय संघटना म्हणून ज्या संघटनेकडे पाहिले जाते ती संघटना म्हणजे लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था सबंध देशभर कार्य चालू असते ग्राहकांचे संघटन करणे, ग्राहकांचे शोषन थांबवणे, फसवणूकी विरुद्ध आवाज उठवणे, ग्राहकांचे प्रबोधन करुन त्याच्यात जाणीव-जागृती निर्माण करण्याचे काम गेली अनेक वर्ष संघटनेच्या माध्यमातून होत आहे या देशव्यापी संघटनेच्या यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्षपदी लोहारा येथील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते मनीष शिरभाते यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष संतोष आडेकर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र आज (२३ सप्टेंबर) रोजी देण्यात आले.

मनिष शिरभाते गेली १० वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून आरोग्य सेवा आणि अन्य समाजसेवी कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. या कार्याची दखल घेत या संस्थेमार्फत त्यांना जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन ग्राहकांची फसवणूक आणि हेळसांड थांबवण्याचे आदेश संस्थेने दिले आहे. मनिष शिरभाते यांच्याकडे असलेले संघटनकौशल्य यामुळे संघटनेच्या वतीने त्यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केली आहे त्याबद्दल त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.