Home यवतमाळ महामानवाच्या अस्थिकलश दर्शनासाठी उसळला जनसागर

महामानवाच्या अस्थिकलश दर्शनासाठी उसळला जनसागर

14

काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर यांचे नियोजन

यवतमाळ:- अखिल विश्वाला शांती, मैत्री व मानवतेची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व त्यांचे अनुयायी यांच्या अस्थिधातु कलश श्रीलंका देशातून त्याच बरोबर महामानव बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे स्थानिक समता मैदानात दर्शन घेण्यासाठी जनसागर मोठ्या प्रमाणात उसळला होता. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
भगवान गौतम बुद्ध त्यांचे अनुयायी सारीपुत्त व महामोग्लयान यांच्या श्रीलंकेतील अस्थी धातु व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अस्थिकलश घेवुन पुणे येथून १० सप्टेंबर रोजी महा कलश यात्रा निघाली आहे.संपुर्ण महाराष्ट्रातून अस्थिकलश महायात्रा मार्गक्रमण करीत आहे. त्याच अनुषंगाने यवतमाळ येथुन ही महायात्रा जाणार असल्याने या अस्थी कलश दर्शनाचा कार्यक्रम स्थानिक समता मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ही यात्रा मैदानावर पोहोचण्यापूर्वी लोहारा, संविधान चौकात अनेकांनी या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. यावेळी श्रीलंका देशातील भदन्त शांतीरसित महास्थवीर, भदन्त नागशील, भदन्त अश्वजित, भदन्त राहुलबोधी, भदन्त रूपाली थेरो, पन्नानाम, रैवत, श्रावण भन्ते धम्मरसित, भदन्त सारीपुत्त, नितीन गजभिये, शीलरत्न महाथेरो, प्रियदर्शिनी भन्ते, आर्याजी सुजाता महाथेरो, भदन्त खेमा यांच्यासह अनेक मंडळी यावेळी उपस्थित होती.
या अस्थी कलश दर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उद्घाटनपर भाषणात संबोधित करताना मांगुळकर यांनी सर्वसामान्यांना अस्थिकलशाचे दर्शन व्हावे.यासाठी या अस्थी यवतमाळात सर्वांसाठी आणण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर संतोष बोरले यांनी आपले विचार व्यक्त करताना डॉ. बाबासाहेबांच्या आणि भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. आंबेडकर, शाहू, फुले यांचे विचार पेरणी करणे काळाची गरज आहे .संविधान रक्षणासोबतच आरक्षण वाचविणे गरजेचे आहे. मनुवादी वृत्तीला आवर घालण्यासाठी एकसंघ होण्याची वेळ असल्याचे ते म्हणाले.

यावेळी अनेकांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी दिनेश करमनकर, अविनाश भगत, बबलू देशमुख, अतुल मांगुळकर, रमेश भिसनकर, रवी ढोक, दत्ता हाडके, बबलीभाई, नितीन मिर्झापुरे, प्रियंका बिडकर, ओम तिवारी, मुकेश देशभ्रतार, नंदू कुडमथे, शुभम शेंडे, अजय मैत्रकर, किशोर शिंदे, शैलेश गुल्हाने, गजानन नवदुर्गे, सुहास सावळकर, मोहन रिनाईत, स्वप्निल भुते, शुभम लांडगे, कृष्णा पुसनाके, नितीन गजभिये, जितेंद्र हिंगासपुरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.