Home बुलडाणा किनगाव राजा येथील महसूल मंडळामध्ये प्रजन्यमापक यंत्रणा पडली धुळखात ,

किनगाव राजा येथील महसूल मंडळामध्ये प्रजन्यमापक यंत्रणा पडली धुळखात ,

14

सिंदखेडराजा ,

किनगाव राजा येथे प्रजन्यमापक यंत्रणा येथे असून ती यंत्रणा पूर्णपणे धुळखात पडली आहे या यंत्रणेमार्फत या मंडळामध्ये किती मिलिमीटर पाऊस पडला याची नोंद होत असते पण अक्षरशा या पर्जन्यमापक यंत्रणेमुळे शेतकऱ्याला पिक विमा व राज्य सरकार केंद्र सरकार यांच्याकडून आर्थिक मदतीसाठी या यंत्रणेचा वापर केला जात आहे पण या यंत्रणेची आज रोजी अशी अवस्था आहे की ती पूर्णपणे धुळखात पडली असून त्या ठिकाणी पूर्णपणे त्या यंत्रणेची वायरिंग आणि अँटेना पूर्णपणे बाजूला पडल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही कारण यावेळी दिनांक 21 सप्टेंबर रोजी या किनगाव राजा परिसरामध्ये परिसरामध्ये कुठेच पाऊस पडलेला नसून 22 सप्टेंबर रोजी 3.5 मिलिमीटर पाऊस पडला असल्याची रेनफॉल रिपोर्ट मध्ये नोंद करण्यात आली आणि 22 सप्टेंबर रोजी ०.३ मिली पाऊस पडल्याची नोंद सुद्धा करण्यात आली ही नोंद करण्याचे एकमेव उद्देश 21 दिवसाचं पावसाचं खंडन जर पडलं तर शेतकऱ्याला सरसकट या मंडळात पिक विमा द्यावा लागतो म्हणून चुकीचा रेनफोल रिपोर्ट या ठिकाणी बनवण्यात आला पण 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते पाच या दरम्यान या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सारखा पाऊस पडला असताना सुद्धा या परिसरामध्ये ०.० मिली पावसाची नोंद रेन फॉल रिपोर्ट मध्ये करण्यात आली त्यामुळे येथील पर्जन्यमापक यंत्रणा पूर्ण नादुरुस्त आहे ही माहिती शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक श्री बालाजी सोसे यांना जेव्हा कळाली तेव्हा त्यांनी तालुका कृषी अधिकारी श्री पांचाळ साहेब यांना लगेच माहिती देऊन त्यांनी स्पॉट पंचनामा करण्याची विनंती केली आणि तालुका कृषी अधिकारी यांनी किनगाव राजा येथे पर्जन्यमापक यंत्रणेची पाहणी आणि संबंधित विभागाला फोनवरून आणि स्पॉट पंचनामा करून ताबडतोब चौकशी करण्याचे दिले आदेश प्रजन्यमापक यंत्रणेचे इंजिनियर श्री मस्के साहेब त्या ठिकाणी तात्काळ त्या पर्जन्यमापक यंत्रणेला भेट देऊन त्यांनी ही मशीन नादुरुस्त असल्याचे त्या ठिकाणी सांगितले म्हणून शेतकऱ्याची फसवणूक होत आहे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे आणि त्या शेतकऱ्यांना पिक विम्याची ऑनलाइन तक्रार करण्यासाठी या रेन्फॉल रिपोर्टचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो आणि त्या ठिकाणी ते रेन फॉल रिपोर्ट 0.0 मिळाल्यामुळे येथील नुकसान होऊन सुद्धा या शेतकऱ्याला मदत मिळणार नाही म्हणून राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन ठिकाणचे पर्जन्यमापक यंत्रणा लवकरात लवकर चालू करावी आणि या किनगाव राजा महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना कुठले निकष न लावता या परिसरातील सरसकट सोयाबीन व इतर पिकाला पिक विमा ऑनलाइन तक्रार करते वेळेस कुठलेही निकष न लावता ती तक्रार ग्राह्य धरावी जेणेकरून शेतकऱ्याला पिक विमा मिळेल अशी मागणी येथील शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक श्री बालाजी सोसे यांनी केली आहे
त्यावेळी उपस्थित देवानंद सोसे , निलेश देशमुख, नितीन सानप शिवानंद पालवे ,कैलास हरकळ शिंगणे सर ,सतीश वायाळ ,दीपक पडोळकर, मधुकरराव साळवे ,रमेश सानप व इतर शेतकरी उपस्थित होते