Home मुंबई शशी मेडिकल चे अनधिकृत बांधकाम? नियमबाह्य बांधकामावर हातोडा.

शशी मेडिकल चे अनधिकृत बांधकाम? नियमबाह्य बांधकामावर हातोडा.

14

मुंबई ,(प्रतिनिधी) एमआयडीसी पारिसरात ओम साई को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी मध्ये असलेल्या तळ मजल्यावरील 14 आणि 15 क्रमांकाच्या सदनिकांचे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियंमबाह्या बांधकाम केले असून लवकरात लवकर अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार आहे.

अंधेरी परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा च्या माध्यमातून झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत प्रकल्प राबवण्यात येऊन 225 चौरस फूट चटई क्षेत्र आकाराच्या सदनिकेचे वितरण झाले.
मात्र: काही जातं व धन दान्डग्यानी पैशाच्या जोरावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियम व अटी धाब्यावर टांगून शासकीय नियमांचे उल्लंघणं केले आहे.

यामध्ये प्रामुख्यान्ने शशी मेडिकल च्या मालकाने सोसायटीच्या पॅसेज चा वापर तसेच परस्पर विरोधी असलेल्या 2 सदनिकांना सलग एकत्र करून 450 चौरस फूट जागे ऐवजी 150 ते 200 चौरस फूट अतिरिक्त जागा अवैद्यरित्या कब्जा केली आहे. तसेच पदपथा वरील 150 चौरस फूट जागा सुद्धा चोरली आहे.

एमआयडीसी व बृहनमुंबई वॉर्ड के (पूर्व) विभाग मुंबई प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही अधिकारी शशी मेडिकल च्या मालकाकडून कडून पैसे घेऊन प्रकरण दाबत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप समाजभूषण विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमासमोर केला आहे.

परप्रांतीय असेच आर्थिक बळाच्या जोरावर अतिक्रमण करून नियमांचे उल्लंघणं करून कायदा व सुव्यवस्था बाधित करत असतील तर अश्या वृत्ती आणि प्रवृत्तीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्ष जाहीर निषेध करत असून लवकरात लवकर अवैद्य पद्धतीने केलेल्या बांधकामावर हातोडा नाही चालवल्यास वरिष्ठाकडे दाद मागण्यात येईल असेही युवा समाजसुधारक डॉ. माकणीकर यांनी सांगितले.