यवतमाळ – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबत शासनाने घेतलेले घातक निर्णय आणि शाळा, शिक्षण ,विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने १८ सप्टेंबर पासून शिक्षकांनी काळ्या फीत लावून कामकाज सुरु आहे.आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून टप्पेनिहाय आंदोलन सुरु झाले आहेत.समाज माध्यमातून बाहेर पडणे,इत्यादी तसेच आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी आक्रोश महामोर्चात शिक्षकांनी सामील होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, शिक्षण,विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संबंधाने शासनाच्या धोरणास प्रखर विरोध करत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार २५ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता महामोर्चा काढत धडक दिली.
शिक्षकांच्या एकजुटीपुढे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार अखेर झुकल्यात जमा असून,शंभर टक्के अनुदानाचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डी येथील राज्य सरकारी कर्मचारी यांच्या महाअधिवेशनात जाहीर केलेले होते. त्यामुळे राज्यातील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक बंधु-भगिनींनी एकत्र येत जिल्हा परिषद शिक्षक सर्व संघटनांचा समन्वय महासंघ यवतमाळच्या वतीने विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.
जोपर्यंत शिक्षकांच्या रास्त मागण्या मान्य होणार नाहीत, शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन पिकाला भाव मिळणार नाही, त्यांच्या हक्काचा पिक विमा त्यांना मिळणार नाही,सरसकट कर्जमाफी होणार नाही,तोपर्यंत टप्प्याटप्प्याने विविध प्रकारचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षक सर्व संघटनांचा समन्वय महासंघ यवतमाळच्या वतीने देण्यात आली.