Home यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी “अन्नत्याग आंदोलनाचा इम्पॅक्ट”

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टिचा मदत निधी “अन्नत्याग आंदोलनाचा इम्पॅक्ट”

20

पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा समावेश केल्याने शेतकरी आनंदीत

यवतमाळ ता.२७ – शेतकरी आंदोलक कृष्णा पुसनाके,शेतकरी नेते सचिन मनवर,कृषी अभ्यासक प्रा.पंढरी पाठे यांनी यवतमाळ येथील आझाद मैदानात १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान कापूस-सोयाबीन पिकाच्या दरवाढी संदर्भात तसेच अन्यत्र मागण्या घेऊन आंदोलन केले होते.त्याचा इम्पॅक्ट आता पडायला सुरुवात झाली आहे.नुकतंच राज्य सरकारनं अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २० सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये एकूण १८ जिल्ह्यांसाठी अवकाळी आणि अतिवृष्टीचा मदत निधी देण्यात येणार आहे.यात यवतमाळ, जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

जून ते ऑगस्ट २०२४ अतिवृष्टी:-
जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांसाठी २३ कोटी ७२ लाख ९३ हजार रुपयांच्या निधीला मंजूर देण्यात आली आहे.या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर डीबीटी पोर्टलवरून जमा करण्याचे निर्देशही राज्य सरकारनं दिले आहेत.
फेब्रुवारी २०२४ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील अवकाळी :-
फेब्रुवारी २०२४ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अवकाळीचा आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळं सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार,असं चिन्हं दिसू लागली आहेत.

ऑगस्ट सप्टेंबर २०२४ च्या अतिवृष्टि मदतीची मात्र प्रतीक्षा :-
विदर्भातील विविध जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीनं धुमाकूळ घातला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त भागाची केली होती. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली होती. तर शेतकऱ्यांना तातडीने मदत निधी देण्याचं आश्वासन कृषिमंत्री मुंडे यांनी दिलं होतं. त्यामुळं मदत मिळेल, अशी शेतकरी आशा धरून आहेत. पण अजून तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
प्रा.पंढरी पाठे – कृषी अभ्यासक,यवतमाळ.