Home यवतमाळ कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या उपोषणाला अखेर आठव्या दिवशी यश…! 

कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या उपोषणाला अखेर आठव्या दिवशी यश…! 

9

बाभुळगाव तालुका प्रतिनिधी

जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल डोफे हे कामगारांच्या प्रमुख मागण्या घेऊन बाभुळगाव येथे तहसील कार्यालयासमोर गेल्या 19 सप्टेंबर पासून ते 26 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत आमरण उपोषणाला बसले होते, प्रशासनाच्या अधिकारी यांनी दाखल घेत,अखेर आठव्या दिवशी उपोषणकर्त्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे उपोषणकर्ते कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या मेहनीतीला अखेर आठव्या दिवशी यश मिळाले यावेळी बाभुळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.पवार साहेब यांनी सर्व ग्रामसेवक यांना ग्रामीण भागातील ओरिजनल गवंडी बांधकाम कामगार व इतर 21 प्रकारचा क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामपंचायत कार्यालयाचा जावक क्रमांक तसेच सही व शिक्का देण्याचे आदेश पारित करण्यात आले,आणि सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे साहेब यांनी तालुकास्तरावर डिनर सेट सोबतच पेटी वाटप सुध्दा कऱण्यात येईल, इन्लिगल ट्रेड युनियन कार्यालय चवणाऱ्यांची माहिती संस्था निबंधक नागपूर यांच्याकडे पाठवण्यात येईल त्यांच्याकडून सूचना अल्यावर इन्लिगल कार्यालय चालवणाऱ्या चालकावर विरूध्द कायदेशीर कार्यवाही करून कार्यालय बंद करण्यात येईल, ज्या कामगारांना 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक व मुख्याधिकारी यांनी सही व शिक्का दिले आहे ते रेकॉर्ड मागण्यात येईल ज्यांचे नाव त्या रेकॉर्ड मध्ये असेल त्यांची नोंदणी व रीनिवल अधिकृत मानल्या जाईल

आणि ज्या कामगारांचे नाव ग्रामपंचायत व न.प.कार्यालयाच्या रेकॉर्डला नसेल अश्या कामगारांची नोंदणी डी ब्लॉक करण्यात येईल तसेच 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक व ठेकेदार यांची सही व शिक्का न घेता कॉपी पेस्ट करून नविन नोंदणी व रीनिवल करून कामगारांची फसवणुक केली त्या कामगारांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी,आणि तालुकास्तरावर देण्यात आलेल्या डब्लू बी ओ सी विभागातील प्रमुख क्लरक कर्मचारी तसेच आरो अधिकारी यांच्या गैरप्रकाराची सविस्तर चौकशी करून उचित कार्यवाही कऱण्यात येईल आदी मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे यांनी देऊन उपोषणकर्त्यांचे समाधान केले त्यानंतर मा राहुल काळे यांनी ज्यूस पाजून रत्नपाल डोफे यांचे उपोषण सोडले या प्रसंगी मिराताई पागोरे मॅडम तहसीलदार बाभुळगाव, गटविकास अधिकारी पवार साहेब,विस्तार अधिकारी हेडाऊ साहेब प.स. बाभुळगाव. डब्ल्यू बी ओ सी विभागा प्रमुख शाकीद,सागर धवणे सरपंच फाळेगाव.सुजाता डोफे, सम्येक म्हैसकर,संजय शेळके,बेबीबाई डोफे, विष्णू राऊत,संघपाल डोफे,दिनेश इंगळे, बंडू वाईकर, उपस्थित होते.