यवतमाळ : कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला नगरपालिकेचे प्रशासन त्यांच्याच विचारांवर चालते. परंतु नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्याच गाडगेबाबांचा पुतळा कचऱ्यात फेकून दिला आहे. या भोंगळ कारभाराबद्दल गुरुदेव युवा संघाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी गुरुदेवकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
यवतमाळ नगरपरिषदेचे उदासीन कामकाज सर्वश्रुत आहे. मुख्याधिकारी मडावी यांच्यानंतर नगरपरिषदेचा डोलारा रसातळाला गेला. नगर परिषदेचे कर्मचारी बेजबाबदार तर अधिकारी उदासीन असल्याचे दिसून येत आहे. कर्मयोगी गाडगेबाबांच्या विचारांवर चालणाऱ्या नगरपालिकेकडून गाडगे बाबांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या इमारती मागे या महान संताचा पुतळा बेवारसपणे फेकून देण्यात आला आहे. गाडगेबाबांचे अवघे आयुष्य स्वच्छतेवर भर देण्यासाठी होते परंतु त्यांच्याच पुतळ्याची कचऱ्यात विल्हेवाट लावल्या गेल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराचा गुरुदेव युवा संघाकडून तीव्र शब्दात निषेध नोंदवल्या गेला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी गुरुदेव युवा संघाकडून लवकरच आंदोलनाची हाक देण्यात येणार आहे याबाबत स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला. नगरपरिषदेचे कामकाज भोंगळ असल्याचे अनेकदा लक्षात येते अधिकारी असो की कर्मचारी हे सगळेच आपल्याच तोऱ्यात असतात सर्वसामान्यांचे बरीच प्रकरणे या कार्यालयाकडून निकाली निघत नाही. मुख्याधिकारी यांचाही कर्मचाऱ्यांवर वचक नसतो त्यामुळे इतक्या मोठ्या लोकसंख्येचे पालकत्व असलेल्या नगर परिषदेचे कामकाज कसे सुधारणार असा प्रश्न गुरुदेवने उपस्थित केला आहे. महान कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा पूर्ण कृती पुतळा नगरपालिकेच्या आवारात आहे परंतु या महान कर्मयोगाला कचऱ्यात फेकण्याचा प्रतापही याच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केला. नगर परिषदेच्या या अफलातून कारभाराचा समाज बांधवांतून असंतोष खदखदत आहे दोषींवर कठोर शासन करण्यासाठी गुरुदेव संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात गेडाम यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून या प्रकारावर कठोर शासन करण्याची मागणी केली आहे. शहरात स्वच्छता असो की सुविधा अशा कोणत्याच बाबतीत नगरपरिषद यवतमाळकरांना समाधान देत नाही. केवळ कर आकारणी करण्यातच नगरपालिका पुढे आहे प्रत्यक्षात कर्मचारी काम कमी आणि टाइमपास जास्त करतो असा आरोप गुरुदेव यांनी केला आहे. गाडगेबाबांच्या पुतळ्याची विटंबना आम्ही खपवून घेणार नाही यातील दोषींना समाजापुढे आणून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी गेडाम यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली.निवेदन देतेवेळी गुरुदेव युवा संघाचे शाखा उपाध्यक्ष भाऊराव वासनिक नेवला मंदा मानकर जुही चावला पवार, जगन,रितेश चौधरी,फैय्याज टक्कर, सामरी, सुहास कांबळे तसेच बाबुलाल उपस्थित होते.
नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना धडा शिकवणार – गुरुदेव
कर्मयोगी गाडगे महाराज हे महाराष्ट्राचे संत आहे. त्यांनी आपल्या आयुष्य स्वच्छतेवर केंद्रित केले. गावोगावी प्रबोधनातून त्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले परंतु त्यांच्याच पुतळ्याला कचऱ्यात फेकण्याची हिंमत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केली. यांना पाठीशी घालणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही आंदोलन उभे करणार आहोत.