Home यवतमाळ ….घुसखोरी सहन करूण घेणार नाही अन्यथा आतंकवादी हाेण्यास भाग पाडू नका

….घुसखोरी सहन करूण घेणार नाही अन्यथा आतंकवादी हाेण्यास भाग पाडू नका

33

धरणे आंदोलनातून सरकारला इशारा

यवतमाळ ता.२८ – अनुसूचित जमाती प्रवर्गामधून धनगरांना आरक्षण देताना राज्यघटनेने आदिवासींना दिलेले आरक्षण काढून घेण्याचा केंद्र व राज्य सरकारचा डाव आहे. आरक्षणामधील ही घुसखोरी कदापीही सहन केली जाणार नाही. शासन विविध कायदे करुन आदिवासींना जंगलामधून हुसकावून लावते आहे.आम्हाला नक्षलवादी हाेण्यास भाग पाडू नका, असा निर्वाणीचा इशारा आदिवासी बांधवांनी शासनाला दिला आहे.
धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शासनाच्या या कृतीविरोधात सर्व आदिवासी संघटनेच्या वतीने यवतमाळ येथील आझाद मैदानाजवळ असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ शनिवार (दि.२८) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाभरातून आलेले हजारो आदिवासी बांधव आंदोलनात सहभागी झाले. केंद्र व राज्य सरकार जातीजातींमध्ये वाद लावण्याचे काम करते आहे. धनगरांना आदिवासी प्रवर्गातुन आरक्षण देण्याचा कट हा त्याचाच एक भाग आहे. मात्र, आमच्या हक्काच्या आरक्षणावर कोणताही धक्का लागणार असल्यास शांत बसणार नाही. आदिवासी समाजातील आमदारांनी याबाबत सरकारची कानउघडणी केली पाहिजे.आपापल्या पक्षाच्या तोंडावर राजीनामे फेकावे. अन्यथा समाज तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही.जल,जमीन व जंगलावर आदिवासींचा हक्क आहे.
आदिवासी समाज संघटनेच्या वतीने यावेळी सुरेश कन्नाके, एम. के. कोडापे, नरेश गेडाम, प्रमोद घोडाम, गुलाब कुडमथे, प्रल्हादराव सिडाम, राजू चांदेकर, प्रवीण मडावी, देवेंद्र चांदेकर, किशोर उईके, प्रा.निनाद सुरपाम,शरद चांदेकर, संजय मडावी,शंकर कोटनाके, सुभाष कासार, नंदु कुडमथे, दिलीप उईके, दिपक करचाल,विनोद मडावी,अरविंद मडावी, संतोष पारधी,बाबाराव उईके,बाळु वट्टी, बंडु मसराम,नरेश उईके,निशांत सिडाम,नरेश उईके,मनिषा तिरणकार, रेखा कन्नाके,निकिता उईके, मंदा मडावी,कृष्णा पुसनाके,शेतकरी नेते सचिन मनवर,इत्यादी उपस्थित होते.

या संघटनांचा सहभाग—-
सर्व आदिवासी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या एकदिवसीय भव्य धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान,आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना, एकलव्य संघटना,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी शक्ती सेना, आदिवासी संघर्ष समिती,आदिम श्रमिक संघटना,उलगुलान कामगार संघटना,हर हर महादेव फौंडेशन,शेतकरी संघटना,संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी,आदिवासी उलगुलान सेना,बिरसा क्रांती दल,ऑल इंडिया आदिवासी युथ असोसिएशन,आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

कोट —-
२०१४ च्या निवडणूकीपूर्वी भाजपने धनगरांना आदिवासी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची फुस लावली. तेव्हापासूनच आदिवासी-धनगरांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मात्र, शासनाने आमच्या ताटाला हात लावल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील.
-प्रा.निनाद सुरपाम(आदिवासी नेते)

आदिवासी प्रवर्गातून धनगरांच्या आरक्षणास आमचा विरोध असून त्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे. जिल्हा परिषद व आदिवासी आश्रमशाळांचे खासगीकरण कदापी होऊ देणार नाही. त्यासाठी लढाईची तयारी ठेवावी.
— विद्याताई परचाके(बिरसा ब्रिगेड,महिला जिल्हाध्यक्षा,यवतमाळ)

धनगर नेतेच त्यांच्या समाजाची फसवणूक करत आहेत. आरक्षणाच्या फसव्या आश्वासनाच्या माध्यमातून जाती-जातींमध्ये वाद लावण्याची भाजपची निती आहे. त्याविरोधात आम्ही सनदशीर मार्गने आंदोलन करतो आहे.
—- विजय मोघे (सिनेट सदस्य,अमरावती विद्यापीठ)

आरक्षणाच्या मुद्यावरुन शासन दिशाभुल करते आहे. आमचा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण आदिवासी समाजाच्या आरक्षणला धक्का लावण्याचे काम सरकार करत आहे. आता आम्ही शांत बसणार नाही. शासन जल, जमीन, जंगल आमच्या ताब्यात आहे हे लक्षात ठेवा.
—- गुलाब कुडमथे(उपाध्यक्ष म.राज्य, आदिवासी फेडरेशन)