शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा
यवतमाळ ता.२८ – अमृत योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही यवतमाळकरांना दहा दिवसा आड पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने शहरातील नागरीक त्रस्त झाले आहेत.अमृत योजनेच्या कामाचा कालावधी संपल्यानंतरही नागरीकांना या योजनेचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे सदर काम करणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.अमृत योजनेचे काम सन २०१९ मध्ये पुर्ण करायचे होते. मात्र कंत्राटदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे तसेच सत्ताधारी आमदाराच्या निष्क्रियतेमुळे ही योजना आजही अपुर्ण आहे.त्यामुळे नागरीकांना दहा दिवसा आड पाण्याचा पुरवठा केल्या जातो.दहा दिवसाच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात असल्याने साठविलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याच्या तक्रारी आहेत.त्यामुळे किमान तीन दिवसा आड पाणी पुरवठा करावा.न केल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा संतप्त नागरिकांनी दिला.
यवतमाळ नगर परीषदेकडे सध्या मुख्याधिकारी नाहीत.प्रशासक सुध्दा प्रभारी आहेत.बांधकाम तसेच आरोग्य विभागात कर्मचारी नाहीत.अशा परिस्थितीत अमृत योजनेमुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीचे काम जीवन प्राधिकरणने नगर परीषदेकडे सोपविले आहे.नगर परीषद स्वताच असक्षम असल्यामुळे त्यांचेकडे जबाबदारी न देता जीवन प्राधिकरणने स्वता किंवा एखाद्या दुस-या विभागामार्फत ही कामे करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते ओम तिवारी,कचरू अग्रवाल,महेंद्र ठोंबरे, किशोर गुल्हाने,बंटी त्रिवेदी, झाकीर भाई,तुषार पोद्दार,दयाराम जयस्वाल,आकाश गुल्हाने,इम्रान पठाण,राम शर्मा,राजू तिवारी, बेबो अग्रवाल,सचिन भरतीया, मंगेश डाहे,अमोल कुराडकर, संतोष कुकुलवार,संजय काकडे, गोपाल शर्मा,नितीन श्रीवास, विवेक वानखडे इत्यादी उपस्थित होते.