Home यवतमाळ यवतमाळच्या दुर्गा उत्सव मंडळाची जय्यत तयारी, “राज्यभरातून भविकांची होणार गर्दी..!’ 

यवतमाळच्या दुर्गा उत्सव मंडळाची जय्यत तयारी, “राज्यभरातून भविकांची होणार गर्दी..!’ 

29

यवतमाळ – राज्यातील सर्वात मोठा दुर्गेात्सव म्हणून यवतमाळची ओळख आहे़. बहुप्रतिक्षेत असलेला नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे़. त्यामुळे यवतमाळ शहरात गेल्या तीस दिवसापासून दुर्गादेवी मंडळाकडून उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे़.

यवतमाळचा दुर्गादेवी उत्सव यावर्षी मोठ्या प्रमाणात व हर्षेाल्हासात साजरा होणार आहे. 3 ऑक्टोंबर नवरात्रोत्सव प्रारंभ होणार आहे़. यवतमाळ येथील दारव्हा मार्गावरील शिवराय दुर्गा देवी उत्सव मंडळाची देखील जोरदार तयारी सुरू असून यावर्षी -तुळजा भवानीचे मंदिर साकारण्यात येणार आहे तसेच राना प्रताप गेट .जगदंबा मंडळ तर्फे -प्रेम मंदिर वृंदावन याची कलाकृती देखणी ठरणार आहे एकवीरा- मंडळ काठमांडू मंदिर देखावा साकार होत आहे़. संकट मोचन.-जगन्नाथ मंदिर आर्कषजिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्हा बाहेरील भाविक यवतमाळ येथे नवरात्र उत्सवा दरम्यान दाखल होत असतात. दर्शनासाठी ठिक ठिकाणच्या मंडळांसमोर देवीच्या दशर्नासाठी भाविकांचा अलोट सागर बघायला मिळतो. यावर्षी देखील याची प्रचिती येणार आहे. ठिकठीकाणी नऊ दिवस महाप्रसादाचे वितरण होत असते जिल्हातील अनेक मंडळांनी यावर्षी देखावा सादर करण्यासाठी बंगालचे कारागिरांना पाचारण केले आहे. गेल्या तीस दिवसांपासून हे कारागीर देखावा निर्माण करण्यासाठी झटत आहेत.